आज (दि 4 मार्च) रोजी शहीद महाविद्यालयामध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन; विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी
कोल्हापूर ४ सिटी न्यूज नेटवर्क
येथील शहीद विरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय येथे आज दि. 4 मार्च रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टी ई कनेक्टिव्हिटी शिरवळ, बी. एस.कोऑपरेशन पुणे, एल अँड एन पुणे अशा मल्टी नॅशनल कंपनीसाठी ,पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. बी.ए.,बी.सी.ए., बी.एस.सी., किंवा डिप्लोमा (कोणतीही शाखा) उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
टी ई कनेक्टिव्हिटी शिरवळ, बी. एस.कोऑपरेशन पुणे, एल अँड एन पुणे अशा मल्टी नॅशनल कंपनीमध्ये काम करायला मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. हया कंपन्या चांगल्या पॅकेज सोबत, वीविध सुविधाही मोफत देत आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि राधानगरी परिसरातील विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले आहे. मुलाखतीसाठी येताना सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन सकाळी ठीक १०:०० वाजता महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/q756XcXokBQdY6P37

Comments
Post a Comment