बुधवार, २९ मार्च २०२३
. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस" दुर्गष्टमी.
चंद्र नक्षत्र - आर्द्रा (रात्री ८.०७ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
मेष:- आर्थिक प्राप्ती होईल. यश मिळेल. सुखाय लाभेल. आनंदी रहाल.
वृषभ:- धार्मिक कार्यांत सहभागी व्हाल. दानाचे पुण्य मिळेल. प्रतिष्ठा सांभाळा. भौतिक सुखे लाभतील.
मिथुन:- विक्री व्यवसायात यश मिळेल. कर्जाची कामे मार्गी लागतील. सरकारी कामात दिरंगाई नको.
कर्क:- कायदे काटेकोर पाळा. स्वतःची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. द्रव्यार्जन होईल. अचानक धनलाभ होईल. सुख लाभेल.
कन्या:- सहकाऱ्यांशी संयमाने वागा. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सरकारी कामे करा आणि कायदे पाळा.
तुळ:- घरापासून दूर जावे लागेल. पित्याची काळजी घ्या. महत्वाची कामे पूर्ण करा.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. मनस्थिती अस्वस्थ राहील.
धनु:- शत्रू पराभूत होतील. विवाह विषयक शुभसमाचार समजतील. भागीदारीत यश.
मकर:- आर्थिक घडी चांगली बसेल. राजकीय यश मिळेल. लेखनातून प्राप्ती होईल. राजकीय बोलणे टाळा.
कुंभ:- घरात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. संतती साठी वेळ द्यावा लागेल. घरात संवाद साधा.
मीन:- सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. घरात शांतता राहील. शेतीची कामे मार्गी लागतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment