खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेकडून जल्लोषी स्वागत
कोल्हापूर दि.२६ :सिटी न्यूज नेटवर्क
शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार श्री.श्रीकांत शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले. मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांची प्रतिकृती म्हणून समस्त शिवसैनिक खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाहतात. आपल्या कार्य कर्तुत्वावर आणि फौंडेशनच्या माध्यमातून लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांचे माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी यांच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने शहरातील वातावरण भगवेमय केले होते. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. यावेळी खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांचे शिवालय परिसरात पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि हलगीच्या कडकडाटात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा विजय असो" "कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला" अशा घोषणांनी शिवालय परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना महिला आघाडीकडून खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांचे औक्षण करण्यात आले.
शिवालय कार्यालयात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी यांच्यावतीने खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांचा चांदीची तलवार, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना अंगीकृत युवासेनेत जाहीर प्रवेश झाला. यामध्ये युवती सेना शहरप्रमुख तेजस्विनी अक्षय घाटगे, उपशहरप्रमुख मंगेश अंबादास चितारे, उपशहरप्रमुख अक्षय प्रभाकर घाटगे, विभाग युवा अधिकारी निलेश अशोक कसबे, विभाग युवती अधिकारी रक्षंदा निलेश कसबे यांनी जाहीर प्रवेश केला. यासह शिवसेना करवीर उप- तालुका प्रमुख पदावर श्री.राजेंद्र सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, प.म.देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, महिला आघाडी महानगरसमन्वयक सौ.मंगल साळोखे, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, महानगरसमन्वयक श्रीमती पूजा भोर, सौ.गौरी माळदकर, सौ.पूजा कामते, सौ.मीनाताई पोतदार, सौ.सुनिता भोपळे, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.शाहीन काझी, सौ.पूजा शिंदे, शिवसेना महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, प्रा.शिवाजीराव पाटील, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment