जिओची ट्रू 5G सेवा चारधाम मंदिर परिसरात सुरू
बद्रीनाथचे दरवाजे उघडल्या सोबतच रिलायन्स जिओची 5G सेवा सुरू
• आपत्ती व्यवस्थापन, निगराणी आणि प्रवासाचे निरीक्षण वेळेवर शक्य होईल- मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
• देशभरातील लाखो यात्रेकरूंना रिलायन्स जिओच्या ट्रू 5G नेटवर्कचा अल्ट्रा हाय स्पीड मिळेल
डेहराडून/बद्रीनाथ, 27 सिटी न्यूज नेटवर्क
रिलायन्स जिओ ने देवभूमी उत्तराखंडच्या चारधाम-बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिर संकुलात ट्रू 5G सेवा सुरू केली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या शुभ मुहूर्तावर जिओ ची 5G सेवा सुरू करण्यात आली. देशभरातून चारधामला पोहोचणाऱ्या लाखो भाविकांना 5G च्या अल्ट्रा हाय स्पीडचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे (BKTC) अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी रिलायन्स जिओच्या 5G सेवेचे उद्घाटन केले. बीकेटीसीचे उपाध्यक्ष किशोर पनवार, सीईओ योगेंद्र सिंह, मंदिराचे मुख्य पुजारी ईश्वर प्रसाद नंबूदिरी आणि जिओचे राज्यस्तरीय अधिकारी उद्घाटनाला उपस्थित होते.
जिओ ट्रू 5G लाँच प्रसंगी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले, "रिलायन्स जिओने उत्तराखंडमधील चारधाम कॅम्पसमध्ये त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. चारधाम यात्रेच्या अगदी सुरुवातीलाच 5G सेवा सुरू केल्याबद्दल आणि राज्याच्या डिजिटल लँडस्केपमध्ये बदल घडवून आणल्याबद्दल मी जिओचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.”
“या सुविधेमुळे राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून येणाऱ्या लाखो भाविकांना हायस्पीड डेटा नेटवर्कचा लाभ घेता येणार आहे. चारधाम येथे 5G सेवांचा यशस्वी शुभारंभ करून, जिओ ने केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर राज्यातील दुर्गम धार्मिक स्थळांमध्ये 5G सेवा प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे पालन केले आहे. तसेच, जिओच्या मजबूत डेटा नेटवर्कच्या मदतीने, चारधाम यात्रेदरम्यान आपत्ती व्यवस्थापन, पाळत ठेवणे आणि यात्रेचे रिअल-टाइम आधारावर निरीक्षण करणे शक्य आहे.
रिलायन्स जिओची उपस्थिती राजधानी डेहराडूनपासून भारत-तिबेट सीमेवरील उत्तराखंड - माना या पहिल्या भारतीय गावापर्यंत दिसते. जिओ हा राज्यातील एकमेव ऑपरेटर आहे ज्याचे नेटवर्क सर्व चारधाममध्ये, केदारनाथ धामच्या ट्रेक मार्गावर आणि 13,650 मीटर उंचीवर असलेल्या श्री हेमकुंड साहिब गुरुद्वारामध्ये उपलब्ध आहे.
लाँच प्रसंगी बोलताना, जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही चारधाम मंदिर संकुलात जिओ ट्रू 5G सेवा लाँच करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. जिओ ट्रू 5G उत्तराखंडसाठी गेम चेंजर ठरेल. त्यातून विद्यार्थी, नागरिक तसेच अभ्यागतांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत, जिओ आपले 5G नेटवर्क उत्तराखंडमधील प्रत्येक शहर, जिल्हा आणि तालुक्यात विस्तारित करेल. उत्तराखंड डिजीटल करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर आम्ही चारधाम मंदिर प्रशासनाचेही आभार मानतो.



Comments
Post a Comment