पेठवडगांव येथे डीएम क्लिनिक लॅबोरेटरीचे उद्घाटन

 पेठवडगांव  येथे डीएम क्लिनिक लॅबोरेटरीचे उद्घाटन




कोल्हापूर २ सिटी न्यूज नेटवर्क 

 कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या हस्ते पेठवडगांव येथे डीएम क्लिनिक लॅबोरेटरीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री राजू बाबा आवळे हे होते. प्रमुख उपस्थित म्हणून राजाराम कारखान्याची माजी चेअरमन श्री सर्जेराव माने सर, माजी उपनगराध्यक्षा श्रीमती प्रविता सालपे , आरटीओ चे माजी सदस्य श्री विजयसिंह माने सरकार , सुभाषराव देसाई,श्री सिद्धोजी बाबा माने सरकार, वडगाव अर्बन बँक माजी संचालक श्री जयसिंगराव पाटील,डॉ श्रेयस जुवेकर हे प्रमुख उपस्थित होते. सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक श्री विश्वम माने व प्रशांत कांबळे  यांनी केले यावेळी   श्री अभिनंदन सालपे,कोल्हापूर जिल्हा काँग्रेस वक्ता विभाग जिल्हाध्यक्ष श्री रणजितसिंह पाटील, युवा ग्रुप चे अध्यक्ष श्री राजवर्धन बावडेकर पाटील,राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, श्री अजित पोवार धामोडकर, वडगाव शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभाग  अध्यक्ष श्री विकासराव कांबळे, इंदिरा कॉलनी अध्यक्ष श्री चांगदेव कांबळे श्री प्रमोद धनवडे श्री वैभव घोरपडे श्री राजाराम कोळी श्री मानसिंग देशमुख, श्री धन्यकुमार पाटील, शेखर भोसले,अमोल कदम,आदि उपस्थित होते. आभार श्रीअमितसिंह घोटणे यांनी मानले यावेळी डीएम क्लिनिक लॅबोरेटरीचे धनंजय देसाई आणि भीमराव देसाई अरविंद जाधव आदी उपस्थित होते 

Comments