नऊ वर्षाखालील मुला मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा

 नऊ वर्षाखालील मुला मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा



शौर्य, विवान, अर्णव,थिया, सांची व राजेश्वरी आघाडीवर*


कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या नऊ ववर्षाखालील मुला मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात सुरू झाल्या.कोल्हापूर जिल्हा रोटरी क्लबचे वरिष्ठ रोटरीयन नासिर बोरसदवाला व डॉक्टर प्रकाश शारबिद्रे यांचे हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आंतरराष्ट्रीय पण भरत चौगुले प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व प्रीतम घोडके उपस्थित होते.यावेळी नासिर बोरसदवाला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने होणाऱ्या बुद्धिबळच्या विविध स्पर्धा व प्रशिक्षणसाठी रोटरीच्या माध्यमातून भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मुलांच्या गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्यात होणार आहे.आज झालेल्या चौथ्या फेरी अखेर द्वितीय मानांकित इचलकरंजीचा शौर्य बगाडिया चार गुणासह आघाडीवर आहे तर अग्रमानांकित इचरकंजीचा विवान सोनी साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.अर्णव पाटील कोल्हापूर, आराध्य ठाकुरदेसाई इचलकरंजी,आदित्य घाटे कोल्हापूर, वेदांत बांगड इचलकरंजी,आदित्य ठाकूर अतिग्रे व अलंकार तेली पाटपन्हाळा हे सहा जण तीन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

मुलींच्या गटातील स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेतली आहे.चौथे फेरीनंतर थिया शहा इचलकरंजी चार गुणासह आघाडीवर आहे तर सांची चौधरी इचलकरंजी व राजेश्वरी मुळे कोल्हापूर  या दोघी तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.या स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड पाच मे पासून नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

Comments