आत्मनिर्भर व स्वावलंबी भारतासाठी सहकार भारती ने पुढाकार घ्यावा : श्री काडसिद्धेश्वर महाराज
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
आत्मनिर्भर व स्वावलंबी भारतासाठी सहकार भारती ने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन कणेरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर महाराज यांनी कोल्हापूर येथे कणेरी सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारणी उद्घाटन क्षेत्रात केले सहकार भारतीची प्रदेश कार्यकारणी बैठक कणेरी येथे सुरू झाली आहे यावेळी उद्घाटन सत्रात परमपूजनीय काडसिद्धेश्वर महाराज, आमदार प्रकाश आवाडे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जवाहर छाबडा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जवाहर छाबडा यांनी केले . यानंतर प्रकाश आमदार प्रकाश आवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले सहकारी बँकांना जिल्हा मध्यवर्ती बँक व नाबार्ड यांच्याप्रमाणेच शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यास परवानगी द्यावी परमपूजनी काडसिद्धेश्वर महाराज आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले रा.स्व संघ विविध क्षेत्रात अनेक संस्था संघटना यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. सर्व क्षेत्रात निरपेक्षपणे संघाचे स्वयंसेवक व संघाचा आयाम असलेल्या संस्था निरपेक्षपणे काम करत आहेत सहकार क्षेत्रात सहकार भारती संपूर्ण भारतात काम करीत आहे काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ बदनाम झाली परंतु सहकार क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्था ही मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सहकार भारती अविरत पुण्यात करत आहे सहकार भारतीचे संस्थापक व प्रणेते स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार यांनी सहकार क्षेत्रात संघाचे स्वयंसेवक असले पाहिजेत व सहकार चळवळ शुद्ध राहण्यासाठी संस्कारीत कार्यकर्ते निर्माण करण्याची जबाबदारी सहकार भारतीची आहे या भावनेने काम केले त्यामुळेच आज सहकार भारतीचे कार्यकर्ते संपूर्ण भारतभर काम करीत आहेत.
घर स्वावलंबी झाले तर गाव स्वावलंबी होते अने गाव स्वावलंबी झाले तर देश स्वावलंबी होईल आत्मनिर्भर होईल. हे आत्मनिर्भर आणि स्वावलंबी भारत निर्माण कार्यात सहकार भारतीने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन केले.
श्री धोंडीराम पागडे यांनी आभार व्यक्त आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख संजय परभणी फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आवडे स्वावलंबी भारत अभियानाचे विनय खटावकर व पदाधिकारी उपस्थित होते

Comments
Post a Comment