दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

बुधवार, १७ मे २०२३, 

Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस 




वैशाख कृष्ण त्रयोदशी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज वर्ज्य दिवस आहे" आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन/मेष. 


चंद्रनक्षत्र: रेवती/अश्विनी. 


मेष:-  अध्यात्मिक लाभ होतील. मन आनंदी राहील. नवीन कल्पना सुचतील. त्यास दिर्घउद्योगाची जोड मिळेल.

 

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. दानधर्म कराल. वस्तू दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येईल.  

 

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. बौद्धिक चमक दाखवाल. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील.


कर्क:- वरिष्ठ खुश होतील. प्रवासातून आणि संवादातून यश लाभेल. पीडा कमी होतील. 

     

सिंह:- उच्च शिक्षणात यश लाभेल. युक्तिवाद कामास येतील. प्रवास घडतील. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.   

 

कन्या:- संमिश्र दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म करा. कर्जे मंजूर होतील. 


तुळ:- आनंदी दिवस आहे. घरासाठी वेळ द्याल. पत्नीकडून उत्तम सहकार्य मिळेल. वादविवादात यश मिळेल.

 

वृश्चिक:-  अनुकूल दिवस आहे. मातुल घराण्याकडून लाभ होतील. आरोग्य सुधारेल. घराची काळजी दूर होईल.

  

धनु:- पराक्रमी दिवस आहे. विद्यार्थ्यांना यशदायी कालावधी आहे. संतती कडून खुशखबर मिळेल. प्रवास घडतील.

 

मकर:- वाहनसुख लाभेल. राहत्या जागेचा प्रश्न सुटेल. मनस्वास्थ्य चांगले राहील. कौटुंबिक सुख लाभेल. 

 

कुंभ:- आर्थिक स्थिती सुधारेल. लेखनातून यश लाभेल. जनसम्पर्क वाढेल. गूढ अनुभव येतील. छोटे प्रवास घडतील.  


मीन:- गृहसौख्य लाभेल. उत्साही वाटेल. आर्थिक लाभ होतील. वक्तृत्वाची छाप पडेल. 

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments