दैनिक राशिभविष्य
Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस
गुरूवार, १८ मे २०२३
वैशाख कृष्ण चतुर्दशी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र - अश्विनी
वर्ज्य दिवस. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.
मेष:- आनंदी दिवस आहे. मौल्यवान खरेदी कराल. छोटे प्रवास घडतील. मात्र वेगावर नियंत्रण ठेवा.
वृषभ:- मनाला अस्वास्थ्य जाणवेल. गूढ अनुभव येतील. गायकांना यश मिळेल. वक्तृत्व चमकेल.
मिथुन:- मनाला उभारी देणारा दिवस आहे. व्यक्तिमत्व उजळून निघेल. सन्मान मिळेल.
कर्क:- स्वतःसाठी खर्च कराल. नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास घडतील.कामाच्या ठिकाणी काहीसे खटके उडण्याची शक्यता आहे.
सिंह:- तीर्थयात्रा घडेल. मौल्यवान खरेदी होईल. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रवासात काळजी घ्या.
कन्या:- सबुरीने वाटचाल केली पाहिजे. वाहन चालवताना काळजी घ्या. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल.
तुळ:- परदेश गमनाचे किंवा सहलीचे योग् आहेत. बुद्धिमत्ता वापराल. पत्नीशी वादविवाद संभवतात.
वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील. व्यवसायात भरभराट होईल. मात्र एखादा कटू अनुभव येऊ शकतो. स्त्री धनात वाढ होईल.
धनु:- समाजात मान सन्मान लाभतील. पत्नी कडून लाभ होतील. धाडसी निर्णय घेताना काळजी घ्या. अनोळखी स्त्रियांपासून सावध रहा.
मकर:- कनिष्ठ लोकांकडून लाभ होतील. अचानक धनलाभ होईल. गृहकलह होऊ शकतो. घरातील उष्णते संबंधीत उपकरणांची काळजी घ्या.
कुंभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. विवाह इच्छुकांना खूषखबर मिळेल. घरात राहणे पसंत कराल. भावंडांशी वाद टाळा.
मीन:- घराभोवती बागबगीचा यात वेळ घालवणे आवडेल. मनासारखा दिवस व्यतीत कराल. मात्र काही कौटुंबिक कटकटींचा सामना करावा लागू शकतो.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment