दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २३ मे २०२३
Powered by वैभव मल्टिसर्विसस, सुकन्या बिझनेस सर्विसेस
जेष्ठ शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे" *विनायक चतुर्थी (अंगारक योग)*
चंद्र नक्षत्र - आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
मेष:- अलंकार खरेदी होईल. बहिणीकडून मदत मिळेल. अकस्मात फायदा होईल. गृहकलह मात्र टाळा.
वृषभ:- गायक आणि कलाकारांना उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील. गृहसौख्य लाभेल.
मिथुन:- मनासारखा दिवस व्यतीत कराल. अचानक लाभ संभवतात. मेजवानीचे योग आहेत.
कर्क:- इष्ट मित्रांवर खर्च कराल. कामाच्या ठिकाणी अचानक नवीन ओळखी होतील. मात्र वरिष्ठ काहीसे नाराज होऊ शकतात.
सिंह:- अति उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. अर्थलाभ होईल. स्वप्ने साकार होतील. प्रवास घडतील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. महत्वाच्या भेटीगाठी थोडक्यात हुकतील.
तुळ:- लक्ष्मी प्रसन्न होईल. जोरदार आर्थिक प्रगती होईल. वाहन सुख लाभेल. कामाच्या ताणात गृहलक्ष्मीकडे दुर्लक्ष नको.
वृश्चिक:- संमिश्र ग्रहमान आहे. प्रवासात अडचणी येतील. पत्नीच्या नावावरील गुंतवणूक मात्र चांगला परतावा देईल.
धनु:- प्राणयरम्य दिवस आहे. गृहसौख्य लाभेल. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल.
मकर:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. घरासंबंधीत कामे मार्गी लागतील. मात्र पत्नीची मर्जी सांभाळावी लागेल.
कुंभ:- मन उत्साही राहील. प्रेमात यश मिळण्याचा दिवस आहे. संदेश वहनातून लाभ होतील. नात्यात थोडाफार तणाव जाणवेल.
मीन:- बाग- बगीचा यात रममाण व्हाल. मनस्वास्थ्य लाभेल. मन मोकळे कराल. अति आत्मविश्वास नको.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment