दैनिक राशिभविष्य
रविवार, २८ मे २०२३.
Powered by vaibhav Ms & SukanyaBB
जेष्ठ शुक्ल अष्टमी, ग्रीष्म ऋतू, उत्तरायण, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज चांगला दिवस आहे" नक्षत्र: पूर्वा फाल्गुना. *दुर्गाष्टमी* आज जन्मलेल्या बाळाची राशी :- सिंह.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) बौद्धिक क्षेत्रात अग्रेसर रहाल. छोटे प्रवास घडतील. अचानक लाभ होऊ शकतात. वारसा हक्काचे कामात अडथळे येतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) ऐच्छिक खर्च कराल. गायकांना यश लाभेल. घरात छोटीशी मैफिल होईल. इतरांना मेजवानी द्याल. कामाच्या ठिकाणी मर्यादाभंग होऊ शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अति उत्तम दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. मन आनंदी राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. आरोग्याची मात्र काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीत बुद्धी चातुर्य दाखवाल. महिला वरिष्ठ कामाची तारीफ करतील. स्वतःच्या चैनीवर खर्च कराल. सरकारी कामात लक्ष द्यावे लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन प्रसन्न राहील. मित्र मंडळी सोबत मौज कराल. प्रवासातून आनंद मिळेल. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. नोकरीच्या कामातून सवड काढा अन्यथा पत्नी नाराज होऊ शकेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकारी उत्तमपणे मदत करतील. सुखद अनुभव येतील. खर्चात वाढ होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पत्नीसाठी आजचा दिवस राखून ठेवण्यास हरकत नाही. कौटुंबिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. छोटी सहल घडेल. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरी, व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू कराल. घरात कुरबुरी होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वाहन सुख लाभेल. वास्तु मध्ये मोठे बदल कराल. खनिज संबंधित व्यवसायात भरघोस यश मिळेल. उजव्या हाताची काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. शेजाऱ्यांशी संवाद होईल. लॉटरीत यश मिळू शकते. इष्ट देवतांची उपासना करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल. मित्रांकडून मदत मिळेल. लेखकांना यश. प्रेमात प्रगती होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक प्रगतीसाठी तुमची बुद्धिमत्ता उपयोगी पडेल. अचानक लाभ संभवतात. वाहन सुख लाभेल. अति धाडस नको.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment