दैनिक राशिभविष्य
सोमवार, ८ मे २०२३
Powered by वैभव मल्टी सर्व्हिसेस सुकन्या बीज सर्व्हिसेस
वैशाख कृष्ण तृतीया. वसंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे. *संकष्ट चतुर्थी* मुंबईचा चंद्रोदय रात्री ९.५३ वाजता.
चंद्रनक्षत्र - जेष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक/ धनु.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आज फार दगदग नको. उत्तरार्ध चांगला आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. संध्याकाळ विश्रांतीची.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा पूर्वार्ध आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. सरकारी कामातून त्रास संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होईल. महिला सहकाऱ्याकडून त्रास होऊ शकतो. उत्तरार्धात गैरसमज दूर होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरातील वॉव टाळा. उच्च शिक्षणात काहीशी वाट बघावी लागेल. प्रवासात काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिष्ठा सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कौटुंबिक वाद होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. व्यवसायात नवीन करार आज नकोत.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अति आत्मविश्वास नको. आरोग्याची काळजी घ्या. अब्रू सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) काव्य, शास्त्र, विनोद यात रममाण व्हाल. संध्याकाळ मुलांसोबत मजेत घालवाल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शेजाऱ्यांशी किरकोळ कुरबुरी होऊ शकतात. संयम ठेवा. मन आनंदी राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामात व्यस्त व्हाल. राजकीय लेखन करताना काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. छंद जोपासाल.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) आर्थिक पाठबळ मिळेल. वारसा हक्काची कामे मात्र रेंगाळतील. संध्याकाळ आनंदाची.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment