दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

शुक्रवार, १६ जून २०२३.




 जेष्ठ कृष्ण त्रयोदशी/ चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज त्रयोदशी वर्ज्य दिवस *शिवरात्री* 


चंद्र नक्षत्र - कृतिका  (दुपारी ३.०७ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ.


मेष:- चंद्राचा बुध आणि शुक्र शी शुभ योग आहे. कलाकारांना उत्तम लाभ होतील. विक्री व्यावसायिकांना यश मिळेल. वाहन सुख लाभेल.   

     

वृषभ:- बौद्धिक चमक दाखवाल. महिलांना एखादा दागिना मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी मात्र मन लागणार नाही. 

 

मिथुन:- मनापासून खर्च कराल. वस्तू दुरुस्तीची वेळ येईल. कलाकारांना यश मिळेल. अर्थलाभ होईल. प्रवासात अडथळे.


कर्क:- उत्तम आणि प्रणयरम्य दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल. स्वप्ने साकार होतील. 

 

सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल.  इतरांसाठी मेजवानी वर खर्च कराल. पत्नीची नाराजी ओढवून घ्याल. 

  

कन्या:- प्रवासाचे बेत आखाल. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. मनासारखा दिवस व्यतीत होईल.  

 

तुळ:-  ज्योतिष विद्येची मदत घ्याल. तीर्थयात्रा घडेल. विश्रांतीची गरज भासेल. 

 

वृश्चिक:- विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील. प्रेमात यश मिळेल. जल पर्यटन घडेल. 


धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील. गुंतवणूक कामी येईल. गृहकलह होऊ शकतो.  

 

मकर:- आज आनंदी दिवस आहे. हास्यविनोद घडतील. छोटी सहल कराल. प्रतिष्ठा पणाला लागेल. 

 

कुंभ:- सत्य वचन कामी येईल. चलाखपणा जाणवेल. पशुधन वाढेल. शेतीतून यश.   

 

मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. मधुर वाणीने सर्वांची मने जिकून घ्याल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments