दैनिक राशिभविष्य
सोमवार, १९ जून २०२३.
आषाढ शुक्ल प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू. शोभन नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज चांगला दिवस आहे"
चंद्र नक्षत्र - आर्द्रा (रात्री ८.११ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संधीचे सोने कराल. आर्थिक चणचण मिटून जाईल.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. वक्तृत्व बहरेल. कलाकारांना लाभ होतील. मौल्यवान खरेदी होईल. दानधर्म कराल.
मिथुन:- अत्यंत आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. जेष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. अध्यात्मिक उंची गाठाल.
कर्क:- खर्चात धार्मिक कामानिमित्त वाढ संभवते. नोकरीत सुखद अनुभव येतील. स्त्री धन वाढेल. तीर्थयात्रा घडेल.
सिंह:- ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली र्हाईल. यात्रा घडेल.
कन्या:- नोकरी व्यवसायात मनासारखी कामे होतील. आनंदी रहाल. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सुधारेल.
तुळ:- पत्नीचा हट्ट पुरवाल. सहल घडेल. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. संतती बाबत खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
धनु:- संतती कडून खुश खबर मिळेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. विरोधक पराभूत होतिल. शेजाऱ्यांशी वाद नकोत.
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मन:शांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील.
कुंभ:- उत्तम दिवस आहे. चंद्र गुरू आणि शनीशी शुभ योग करत आहे. ज्योतिष आणि आध्यत्मिक विषयक लाभ होतील. आर्थिक स्थिती भक्कम राहील.
मीन:- वास्तू संबंधित प्रश्न सुटतील. चिंता मिटेल. धार्मिक कार्यास खर्च कराल. राजकीय पेचप्रसंग टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment