दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २० जून २०२३.
आषाढ शुक्ल द्वितीया. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज उत्तम दिवस
चंद्र नक्षत्र - पुनर्वसू (रात्री १०.३६ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन/कर्क.
मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. अध्यात्मिक ओढा वाढेल. नोकरीची कामे उशिरापर्यंत चालतील.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. मन आनंदी राहील. संध्याकाळ अनपेक्षित आनंदाची.
मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. नोकरीत अनपेक्षित लाभ होतील. दुपारनंतर कामाला वेग येईल.
कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. उत्तरार्ध चांगला आहे.
सिंह:- पूर्वार्ध चांगला आहे. कामे उरकून घ्या. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तजवीज होईल. व्यवसायात यश मिळेल.
तुळ:- आज ग्रहमान अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. वेग मात्र कमी राहील.
वृश्चिक:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कौटुंबिक पातळीवर यश मिळेल. मन शांत ठेवा. उत्तरार्ध संथ आहे.
मकर:- ग्रहमान अनुकूल आहे. काही कामे मात्र रेंगाळतील. घाई करू नका. सर्वकाही ठीक होईल. संध्याकाळ आळसात जाईल.
कुंभ:- अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. इतरांवर चांगली छाप पडेल.
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. अनपेक्षित लाभ होतील. शेअर्स मधून यश.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment