बुधवार, २८ जून २०२३
. आषाढ शुक्ल दशमी. ग्रीष्म ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज शुभ दिवस"
आज चंद्र 'चित्रा' नक्षत्रात आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.
मेष:- भागीदारी व्यवसायात यश लाभेल. जोधधंदा सुरू कराल. राजकीय लेखनातून यश मिळेल.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तरतूद होईल.
मिथुन:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा लाभेल. मान सन्मान मिळतील.
कर्क:- गृहसौख्य लाभेल. वाहन सुख उपभोगाल. प्रसन्न वाटेल. प्रतिष्ठेसाठी खर्च कराल.
सिंह:- अत्यंत लाभदायक दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. उत्तम व्यवसाय होईल. स्पर्धेत सरशी होईल.
कन्या:- शब्दास मान मिळेल. नोकरी, व्यवसायात तुमचा दबदबा वाढेल. कीर्ती पसरेल.
तुळ:- प्रगतीदायक दिवस आहे. मन आनंदी राहील. धाडसी निर्णय घ्याल. प्रवास घडतील.
वृश्चिक:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल मात्र मेहनत वाढवावी लागेल.
धनु:- अत्यंत आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका.
मकर:- कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. नवीन ओळखी होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल.
कुंभ:- यश देणारा कालावधी आहे. नवनवीन कल्पना राबवा. पोषक वातावरण आहे. आर्थिक प्रगती होईल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. इष्ट मित्रांची नाराजी दूर करा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 9422245510)
Comments
Post a Comment