दैनिक राशिभविष्य
गुरूवार, २९ जून २०२३.
आषाढ शुक्ल एकादशी. ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *शयनी एकादशी* आहे.
चंद्र स्वाती' नक्षत्रात आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.
मेष:- संमिश्र दिवस आहे. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. गृहकलह टाळा.
वृषभ:- नोकरीत चांगले अनुभव येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक कार्यात अधिक लक्ष घाला.
मिथुन:- छोटे प्रवास घडतील. संतती साठी खर्च कराल. धाडसी निर्णय घ्याल. अनपेक्षित घटना घडतील.
कर्क:- सरकारी कामातून यश लाभेल मात्र सचोटी सोडू नका. नोकरीत त्रास जाणवेल.
सिंह:- शत्रू पराभूत होतील. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात. प्रवासात त्रास. अनपेक्षित नुकसान संभवते.
कन्या:- आर्थिक आवक चांगली राहील. कनिष्ठ मदत करतील. गूढ आणि तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल.
तुळ:- मन अस्वस्थ राहील. नोकरीत ताणतणाव वाढेल. पत्नीशी मतभेद संभवतात. भागीदारी व्यवसायात नुकसान.
वृश्चिक:- प्रतिकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. आराम करा.
धनु:- संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सामाजिक समर्थन प्राप्त होईल. संततीशी मतभेद संभवतात.
मकर:- राजकारणात त्रास जाणवेल. शत्रू डोके वर काढतील. नोकरीत कटकटी होऊ शकतात.
कुंभ:- नववा चंद्र तिसऱ्या गुरू आणि हर्षलशी प्रतियोग करत आहे. लेखकांनी काळजी घ्यावी. मोजके बोलावे. शनी - रवी शुभ योग आनंद निर्माण करेल.
मीन:- गृहसौख्यत कमतरता जाणवेल. आर्थिक बाजू जरा कमी पडेल. सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment