प्रशासकपद रिक्त ठेवून कोल्हापूर वर अन्याय: 'आप'चा आरोप
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महापालिकेच्या माजी आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची दोन जून रोजी बदली झाली. परंतु तीन आठवडे उलटूनही अद्याप महापालिकेवर पूर्णवेळ प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही.
पूर्णवेळ प्रशासक न नेमल्याने महापालिका कामकाजावर परिणाम होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिका सभागृह अस्तित्वात नाही. यामुळे महापालिकेचा सर्व कारभार प्रशासकांच्या हातात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकपद रिक्त ठेवून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोल्हापूरवर अन्याय करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.
अशापद्धतीने प्रशासकपद रिक्त ठेवण्यामागे कोणता वेगळा हेतू आहे का, आपल्या मर्जितला अधिकारी कोल्हापूरला आणण्यासाठी इतका वेळ सत्ताधाऱ्यांकडून घेतला जात आहे का असाही सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
प्रशासकपद त्वरित भरावे या मागणीसाठी आप च्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, विजय हेगडे, दुष्यन्त माने, पूजा अडदांडे, संजय नलवडे, सदाशिव कोकितकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment