कोल्हापूर मनसे तर्फे राज ठाकरे यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
ना हार , ना बुके , ना फटाके या सर्व बाबींना फाटा देऊन गोरगरीब दीनदुबळ्या रुग्णांना व विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे विधायक उपक्रमांचा वारसा जपणाऱ्या शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांचे वतीने व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय ( सीपीआर ) येथे डॉ. आरती घोरपडे ( अधिष्ठाता - शासकीय महाविद्यालय ) डॉ. गिरीश कांबळे , आरोग्यदूत बंटी सावंत यांनी ट्रॉमा केअर सेंटर या आयसीयू विभागासाठी रेफ्रिजरेटर ( फ्रिज ) स्वीकारला.
सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये डॉ. रमेश जाधव ( आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका ) , डॉ. पावरा यांनी ऑपरेशन थेटर मधील दोन सक्शन मशीन स्वीकारलेत.
कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शैक्षणिक दृष्ट्या आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळवलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नीता ठोंबरे व शिक्षक वृंद यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर प्रणाली स्वीकारली.
वरील सर्व उपक्रमांस शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, अभिजीत पाटील , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राहुल कुंभार , अमित पाटील, निलेश आजगावकर , सुनील तुपे, राजन हुल्लोळी, दिलीप पाटील , अभिजीत राऊत , अजिंक्य शिंदे , सॅम मुधाळे, विक्रम नरके , मोहसीन मुल्लाणी, राहुल पाटील , उत्तम वंदुरे , संभाजी कांबळे , हेमंत जानवेकर , संजय पाटील, बाजीराव दिंडोर्ले, गणेश साळुंखे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments
Post a Comment