धुवाँधार पावसात ऑफ रोडिंग स्पर्धांचा थरार स्पर्धकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 


धुवाँधार पावसात ऑफ रोडिंग स्पर्धांचा थरार

स्पर्धकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद



कोल्हापूर,  २४ सिटी न्यूज नेटवर्क

गगनबावडा येथील धुवाँधार पाऊस आणि स्पर्धकांचा अभूतपूर्व उत्साह अशा वातावरणात वेसरफ येथे आज ऑफ रोडिंग स्पर्धांना प्रारंभ झाला.


वेसरफ (ता. गगनबावडा) येथील आजरीज इको व्हॅली येथे जीपच्या ऑफ रोडिंग स्पर्धांचे आयोजन केले आहे. देशभरातून ५० स्पर्धकांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन डी. वाय. पाटील साखर कारखाना येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी मोहिते, ध्रुव मोहिते, राजशेखर आजरी, ऋग्वेद आजरी, आयुब खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान, प्रत्यक्ष आजरीज इको व्हॅली येथे स्पर्धक पोहचले त्यावेळी धुवाँधार पावसास सुरवात झाली. अशा पावसातच स्पर्धांना सुरवात झाली. यामध्ये क्लासिक, एक्स्पर्ट आणि मॉडिफाईड अशा तीन प्रकारची स्पर्धा झाली. परीक्षक म्हणून अश्विन शहा, आयुब खान, पल्लवी यादव, प्रशांत काशीद, रोहित गावडा आणि संतोष एच. एम. यांनी काम पाहिले. उद्या उर्वरित तीन प्रकारची स्पर्धा होऊन बक्षीस वितरण होईल.


अकासा इव्हेंटचे संचालक अभिजित बोगार, कोल्हापूर इनलॅडर्स, कोल्हापूर ऑफ रोडर, क्लब फोर बाय फोर, साई व्हिल्स, यश मोटर्स, एबी ग्रुप कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले.



Comments