कोल्हापुरात होणाऱ्या ऑफ रोडिंग स्पर्धेची तयारी पूर्ण | मान्यवरांच्या उपस्थितीत टी शर्टचे अनावरण


 


कोल्हापुरात होणाऱ्या ऑफ रोडिंग स्पर्धेची तयारी पूर्ण

मान्यवरांच्या उपस्थितीत टी शर्टचे अनावरण 

फोटो – वेसरफ (ता. गगनबावडा) येथे होणाऱ्या ऑफ रोडिंग स्पर्धेच्या टी शर्टचे अनावरण कोल्हापुरात शुक्रवारी करताना रोहित गावडा, संतोष एच. एम. कृष्णराज महाडिक, आयुब खान, पल्लवी यादव, ऋग्वेद आजरी व अश्विन शिंदे.


आजरीज इको व्हॅलीच्या ऋग्वेद आजरी यांची माहिती


कोल्हापूर, ता. 23 सिटी न्यूज नेटवर्क

 आजरीज इको व्हॅली, वेसरफ येथे पहिल्यांदाच होणाऱ्या जीपच्या (4X4) ऑफ रोडिंग स्पर्धांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती ऋग्वेद आजरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत टी शर्टचे अनावरण झाले.



ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी महत्त्वाच्या असलेल्या  गगनबावडा-वेसरफ येथे निसर्गाशी एकरुप होऊन, निसर्गाला हानी न पोहोचवता आजरीज इको व्हॅलीची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्राला पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे. येथे पहिल्यांदाच होणाऱ्या ऑफ रोडिंग स्पर्धांना आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे.


स्पर्धेचे नियोजन करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू अश्विन शिंदे म्हणाले, दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण ५० स्पर्धक सहभागी होतील. यामध्ये ब्लाईंड ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह, नाईट ड्राईव्ह, टाईम ट्रायल अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा होतील. यासाठी राज्यासह  गोवा, कर्नाटक, दिव दमण येथील स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. याचबरोबर सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकरिता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित ऑफ रोडरही उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारा ट्रॅक, टी शर्ट, मेडिकल टीम, रेस्क्यू टीम, अशा तयारीबरोबरच आपण सर्व आतुरतेने ज्याची वाट पाहत आहोत तो पाऊस गेल्या दोन दिवसांपासून आपली हजेरी लावत आहे. त्यामुळे उत्साही वातावरण आहे. स्पर्धेची रंगीत तालीमही आज घेण्यात आली.


ते म्हणाले, स्पर्धेसाठी ऑफ रोडिंगचा बादशहा म्हणता येईल असे बंगळूर येथील आयुब खान, चंद्रमौली, कृष्णराज महाडिक, ध्रुव मोहिते, कार रेसर पल्लवी यादव, बाईक रायडर प्रशांत काशीद, रोहित गावडा आणि संतोष एच. एम. (हंपी) आदी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


अकासा इव्हेंटचे संचालक अभिजित बोगार, कोल्हापूर इनलॅडर्स, कोल्हापूर ऑफ रोडर, क्लब फोर बाय फोर, साई व्हिल्स, यश मोटर्स, आरओसीए, सातारा ऑफ रोडर, सह्याद्री ऑफ रोडर पुणे, ट्रेल हंटर, एबी ग्रुप, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब, यांचे मोठे सहकार्य मिळणार आहे. 



विजेत्यांना प्रवेश मोफत


येथे सहा प्रकारात होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना हंपी येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत मोफत प्रवेश असेल, अशी माहिती रोहित गावडा आणि संतोष एच. एम. यांनी यावेळी दिली.

Comments