कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा बीआरएस लढवणार
संजय पाटील बी आर एस नेते
कोल्हापूर दि.20 सिटी न्यूज नेटवर्क
भारत राष्ट्र समिती पक्षाची जिल्हास्तरीय तालुका समन्वयकांची जिल्हा बैठक राजारामपुरी येथे आयोजित करण्यात आली होती ,या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बी आर एस पक्षाचे नेते संजय पाटील होते. यावेळी प्रास्ताविक तोहीद बक्षु यांनी केले त्यावेळी मार्गदर्शन करताना संजय पाटील म्हणाले, कार्यकर्त्याला नेता करणारा एकमेव पक्ष भारत राष्ट्र समिती असून प्रस्थापित पक्षांच्या घराणेशाही विरोधात तसेच प्रस्थापित राजकारणा विरोधात चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत संधी देऊन एक सक्षम पर्याय निर्माण करण्याचे काम भारत राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून केले जात आहे आणि तसे आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री व बी आर एस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के सी आर यांनी मेळाव्यात यापूर्वीच दिलेले आहे. राज्यात आणि देशात किसान सरकार आणण्यासाठी लोकसभा लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री के सी आर यांनी घेतलेला आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्षम पर्याय हुडकून निवडणूक लढवली जाणार आहे कोल्हापूर सह हातकणंगले मतदारसंघातील अनेक दिग्गज नेतृत्वाने पक्षाकडे उमेदवारी बाबत पक्षप्रवेशा बाबत विचारणा केलेले आहे हैदराबाद येथे त्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी संजय पाटील यांच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या नेतृत्वाने कोल्हापूर लोकसभा लढवावी असे यापूर्वी स्पष्ट केलेले आहे. तेच ते चेहरे ' नेहमीचीच राज घराणि यांना कंटाळलेली जनता कोल्हापूर जिल्ह्यात निश्चितच परिवर्तन घडवून आणून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बी आर एस ला संधी देईल असे ते म्हणाले. यावेळी पक्षाचा प्रचार ,प्रसार सभासद नोंदणी, याबाबत तालुका समन्वयकांचा आढावा घेण्यात आला
जास्तीत जास्त लोकांपर्यंत तेलंगणा मॉडेल कसे नेता येईल सभासद नोंदणी कशी वाढवता येईल याचे अनुषंगाने शेतकरी नेते बीजी पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी संग्राम जाधव, शशिकांत आमने, अभिजीत मोहिते ,विक्रम जरग, सलीम पठाण, दीपक पाटील, दिलीप चव्हाण ,भीमराव पाटील, विश्वनाथ आंबपकर ,सतीश मोठे, विजय धंगेकर, नेताजी गिरी बुवा, विक्रम पाटील, सोशल मीडियाचे सुशांत कांबळे यांच्यासह उद्योगपती साकेत राज देशमुख सोनाई पशु खाद्य आहार हे उपस्थित होते. आभार दिलीप चव्हाण यांनी मानले
Comments
Post a Comment