कै बाबुराव जोशी स्मृति कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा

 कै बाबुराव जोशी स्मृति कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धा 



*जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर उपविजेती तर दिशा पाटील तृतीय*


कोल्हापूर  12 सिटी न्यूज नेटवर्क

 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेली कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले.तृतीय मानांकित कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकर ने चार गुणासह उपविजेतेपद संपादिले तर जयसिंगपूरच्या दिशा पाटील ला चार गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.महिमा शिर्के कोल्हापूर,अरिना मोदी कोल्हापूर व संस्कृती सुतार नांदणी यांचा अनुक्रमे चौथा, पाचवा व सहावा क्रमांक आला.या सहा जणीची निवड चंद्रपूर येथे 16 ते 18 जून दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे.स्पर्धेचा बक्षीस समारंभ स्पर्धा पुरस्कर्त्या शिल्पा जोशी-पुसाळकर आणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सदस्या व गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्या अनिता काळे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे,धीरज वैद्य व आरती मोदी उपस्थित होते राजेंद्र मकोटे यांनी कार्यक्रमाचेे सूत्रसंचालन केले.

Comments