अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदें यांची कुटुंबासह आत्महत्या

 अर्जुन उद्योग समूहाचे  संतोष शिंदें यांची कुटुंबासह आत्महत्या



कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यातील खाद्यतेलातील एक अग्रगण्य असणाऱ्या "अर्जुन" ब्रँड चे सर्वेसर्वा संतोष शिंदे यांनी राहत्या घरी कुटुंबासह आत्महत्या केली आणि  संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली.  

 खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याने,  तणावाखाली असलेल्या  संतोष शिंदें यांनी कुटुंबासह आत्महत्या केली.  

संतोष शिंदे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये  औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेलं होते. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात ते कुटुंब सह राहत होते.

संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला आहे. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरावासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

Comments