आपल्या रंकाळा तलावाचे वैभव राखण्यासाठी आपण सर्वजण खारीचा वाटा उचलून या : संध्यामठ येथील खुल्या चर्चासत्रात व्यक्त झाला सूर
आपल्या रंकाळा तलावाचे वैभव राखण्यासाठी आपण सर्वजण खारीचा वाटा उचलून या : संध्यामठ येथील खुल्या चर्चासत्रात व्यक्त झाला सूर
कोल्हापूर - २१ सिटी न्यूज नेटवर्क
आपल्या जन जीवनाशी आणि भावविश्वाशी एकरूप असलेला रंकाळा तलाव हे आपले जलवैभव आहे आणि ते वैभव राखण्यासाठी आपण प्रत्येक जण व्यक्तिगत आणि सामुहीक पातळीवर आपला खारीचा वाटा उचलुया असा सूर तीनही बाजूने पाणी असलेल्या संध्यामठ येथे मान्यवरांनी व्यक्त केला .सायंकाळच्या सूर्याच्या साक्षीने झालेल्या या चर्चासत्रात सर्वांचे स्वागत राजेंद्र मकोटे यांनी करत विविध पैलूंनी रंकाळ्याचा इतिहास नव्या युवा पिढी पुढे आला पाहिजे असे आग्रहाने मत व्यक्त केले . मुर्ती - जल अभ्यासक अँड . प्रसन्न मालेगाव यांनी 'रंकाळ्याचे पौराणिक - धार्मिक आणि जल संर्वधन विषयक विविध पैलू सांगत त्यांची सोशल मीडियाच्या ते माध्यमातून सर्वांसमोर व्यापकतेने यावेत असे मत व्यक्त केले . शाहीर राजू राऊत यांनी आजवर रंकाळ्यासाठी झालेल्या विविध आंदोलनाचा आढावा घेत प्रशासन मुर्दाड असले तरी आपण सामूहिक प्रेरणांनी आपला दबाव गट कायम ठेवला पाहिजे आणि रंकाळ्याचे होत असलेले होत असलेले आक्रमण आणि व्यापारीकरण हे रोखण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले . रंकाळा अभ्यासक अशोक देसाई यांनी प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध होऊनही चुकीच्या पद्धतीने होत असलेला विकास हा जागरूक नागरिक आणि रंकाळा प्रेमी रोखू शकतात आणि त्यासाठी सातत्याने रंकाळा विषयी प्रबोधन आपण सर्वजण मिळून करू असे मत व्यक्त केले .विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अँड. सुधीर जोशी - वंदरका यांनी संध्यामठ येथील पाण्यात जाऊन असलेल्या गणेश मूर्ती आणि महादेवाच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले आणि आगामी काळात विविध पैलू नी संध्यामठ - रंकाळा विषयी जन जागृतीचा निर्धार व्यक्त केला . यावेळी पक्षी निरीक्षक बंडा पेडणेकर यांनी रंकाळ्यावरचे पक्षी हे एक मोठे वैभव असून या ठिकाणी 54 प्रकारचे स्थलांतरित पक्षी येत असून तब्बल 284 पक्षाची नोंद सर्वेक्षण झाल्याचे नमूद करत एक निसर्ग विविधता जपण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न आहेत असे आग्रहाचे मत व्यक्त केले .यावेळी हिमालय बेस कॅम्प यशस्वीरित्या करून आलेल्या विद्या चव्हाण यांचा आरोग्य भारतीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी माळकर आणि दुर्गा वाहिनीच्या श्वेता कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . विविध मान्यवर मत व्यक्त करणाऱ्यांना सावलीचे सावली फाउंडेशनचे किशोर देशपांडे यांच्या हस्ते उपस्थिती देऊन त्यांचेही पुष्पगुच्छ देण्यात आली .
यावेळी सुप्रिया दळवी यांच्यासह शिवानी शिंदे वैशाली सदगीर , इनर लाईट च्या दिलारा शिकलगार , डॉ . विरेंद्र वणकुद्रे , प्रा . मिंलिद करजगार , वैभवी चव्हाण, सागर ठाणेकर ,रणजीत भालकर, वैष्णवी साळुंखे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली . शेवटी डॉक्टर संदीप पाटील यांनी ' नेहमीच सकारात्मक विचार आणि पूर्णपणे सात्विक आहार आणि मनाची प्रसन्नता या त्रिसूत्रीनेच आपण डॉक्टर पासून लांब राहू शकतो असे सांगून नियमित ओंकार करावा त्यामुळे आपल्या शरीरात एक आत्मिक शक्ती निर्माण होते असे मनोगत व्यक्त केले . शेवटी सामुदायिक ओमकार ध्वनीने या रंकाळा - संध्यामठ केंद्रीत चर्चासत्राची सांगता झाली .
Comments
Post a Comment