दैनिक राशिभविष्य
शुक्रवार, ३० जून २०२३.
आषाढ शुक्ल द्वादशी, ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज चंद्र गुरूच्या 'विशाखा' नक्षत्रात आहे. आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे. घबाड दुपारी ४.१० पर्यंत. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ/वृश्चिक.
मेष:- लेखनातून लाभ होतील. कलाकारांना चांगला दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. संध्याकाळ आरोग्य चिंतेची.
वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. वक्तृत्व चमकेल.
मिथुन:- जेष्ठ व्यक्तीचा सहवास लाभेल. धनप्राप्ती होईल. प्रवास घडतील. गुंतवणूक कामास येईल.
कर्क:- नोकरीच्या ठिकाणी चमत्कारिक अनुभव येतील. शेजाऱ्यांशी वादविवाद टाळा.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. प्राध्यापकांना चांगला दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. नवीन व्यावसायची सुरुवात होईल.
कन्या:- कौटुंबिक सौख्य लाभेल. धनवृद्धी होईल. आरोग्याचे प्रश्न सुटू लागतील. वरिष्ठ खुश होतील.
तुळ:- आध्यत्मिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मेजवानी मिळेल. आप्त भेटतील.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. मन अस्वस्थ राहू शकते. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
धनू:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी.
मकर:- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मितभाषी असूनही कार्यसाधन होईल. मौनं सर्वार्थ साधनांम.
कुंभ:- जेष्ठ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. प्रवास कार्यसाधक होतील. मात्र प्रवासाचे नियोजन बदलेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. आज महत्वाचे कामे नकोत. चुकीचे निर्णय होऊ शकतात.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment