योग क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी : डॉ. आश्विनी माळकर
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी उपस्थितआरोग्य भारती या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अश्विनी माळकर डॉ. उल्का देशपांडे योग प्रशिक्षक पांडुरंग गोळे पत्रकार राजेंद्र मकोटे यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक आर वाय पाटील यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर बी माने यांनी केले .
आपले शरीर आणि मन सुदृढ राहण्यासाठी योग क्रिया महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले . योग या क्षेत्रात करिअरच्या ही अनेक संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले . आपल्या देशात व्यायामाच्या चुकीच्या कल्पना पसरवल्या जात असून योग आणि आयुर्वेद याचे महत्त्व लोकांच्या लक्षात येत नाही असेही सांगितले .
योगप्रशिक्षक पांडुरंग गोळे आणि डॉक्टर उल्का देशपांडे यांनी विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली .
कार्यक्रमाचे आभार श्री ए .के देसाई यांनी मानले .
Comments
Post a Comment