मणिपूर अत्याचार विरोधात आप ची निदर्शने



मणिपूर अत्याचार विरोधात आप ची निदर्शने


कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क

मणिपूर येथे दोन गटांमध्ये हिंसाचार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. राज्यात इंटरनेट बंदी असल्याने तेथे होत असणाऱ्या घटना बाहेर येत नव्हत्या. परंतु, एका जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


आम आदमी पार्टीने बिंदू चौक येथे जोरदार निदर्शने करून मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध केला. गेल्या तीन महिन्यांपासून अशाप्रकारचे हिंसाचार व अत्याचार सुरु असून ते रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. देशातील महिलांच्या सुरक्षितेतीचा प्रश्न गंभीर होत आहे. एकीकडे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना पंतप्रधान मोदी त्याकडे दुर्लक्ष करून विदेश दौरे करत आहेत. याचा परिणाम म्हणून मणिपूर मध्ये 160 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आम आदमी पार्टी याचा निषेध करत असल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.


यावेळी अमरजा पाटील, पूजा अडदांडे, उषा वडर, स्मिता चौगुले, साक्षी देसाई, सुनीता मोहिते, आशा सोनावणे, अरुण गळतगे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, समीर लतीफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी, सदाशिव कोकितकर, रवींद्र राऊत, नाझील शेख, उमेश वडर, मयूर भोसले, संजय सूर्यवंशी, विलास पंदारे, लाला बिर्जे, राजेश खांडके, महेश घोलपे, प्रकाश हरणे, आनंदराव चौगुले, किशोर राठोड, रमेश कोळी आदी उपस्थित होते.

Comments