बी आर एस पक्षाकडून संजय पाटील कोल्हापूर लोकसभा लढविणार


बी आर एस पक्षाकडून संजय पाटील कोल्हापूर लोकसभा लढविणार



कोल्हापूर दि 18 सिटी न्यूज नेटवर्क

*कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा बीआरएस पक्षातर्फे लढवणार हे यापूर्वीच पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांकडून श्री संजय पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवावी असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे लक्षवेधी स्टार आंदोलक म्हणून मला संजय पाटील यांना संपूर्ण जिल्हा ओळखतो माझ्या नेतृत्वाखाली कामगार कष्टकरी शेतकरी  रेशन जात पडताळणी महापालिका जिल्हा परिषद जनसमानांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने शेकडा आंदोलने करण्यात आलेले आहेत कोणतेही आंदोलन मध्येच सोडून न देता सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील औषध घोटाळा आणि गहू घोटाळा हा विधानसभेत गाजला त्या अनुषंगाने मोठी कारवाई सुद्धा झाली आजपर्यंत भ्रष्टाचार व काळाबाजार या विरोधात लढताना आतापर्यंत 13 अधिकारी निलंबित झालेले आहेत त्याचबरोबर 18 रेशन दुकाने आतापर्यंत रद्द करण्यात यश आले आहे अभ्यासपूर्ण मांडणी व विषयाची तड लावण्याचे ध्येय ठेवल्यामुळे आंदोलनांना विशेष मिळाले त्याचबरोबर टोकाला जाऊन काम करण्याच्या सवयीमुळे 2007 मध्ये माझ्यावर भीषण हल्ला सुद्धा झाला रेशन काळाबाजारच्या रॉकेलच्या अनुषंगाने तरीही दुसऱ्या दिवशी महापालिकेसमोर जखमी अवस्थेमध्ये आंदोलन करून राजारामपुरीतील नॉर्वेकर नावाचे भाजी मार्केट वाचवण्यात यश मिळवले युरिया टंचाईच्या काळात अनेक वेळा उग्र आंदोलन करून शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यास भाग पाडले रेशन वरील रॉकेल ग्रामीण भागाचे काही शहरांनी रॉकेल काळा बाजारासाठी आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले होते अभ्यास पूर्व मांडणी करून ग्रामीण भागाला एक लाख 51 हजार लिटर रॉकेल परत जोडावे लागले हे मोठे यश आहे साखर कारखान्यांना अध्ययवत इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवण्यास भाग पाडले त्याचबरोबर शेतकऱ्यांना वजन समजावे यासाठी मोठे डिस्प्ले लावण्यास कारखान्यांना भाग पाडले काही कारखाने प्रिंटर बंद करून हाताने पावत्या देत होते हे लक्षात येतात कारखान्यांना तातडीने प्रिंटर बसवण्यास भाग पाडले त्याचबरोबर साखर उतारा तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राज्य शासनाने उभी करावी असे निवेदनातून मांडले मध्यमवर्गीय कुटुंबातील व निष्कलंक चेहरा म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील जनता निश्चितच मला स्वीकारेल असा विश्वास आहे परंपरागत तेच ते निष्क्रिय चेहरे  तीच घराणी याला आता जनता कंटाळलेले असून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आत्महत्या मुक्त तेलंगणा करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या बी आर एस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कल्याणासाठी व आर्थिक उत्कर्षासाठी आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र बनवण्यासाठी माझ्याबरोबरच बी आर एस पक्षाला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लोक नक्कीच स्वीकारतील असा मला ठाम विश्वास आहे*


Comments