कोल्हापूर जिल्हा खुल्या वरिष्ठ निवड बुद्धिबळ स्पर्धा जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य

 कोल्हापूर जिल्हा खुल्या वरिष्ठ  निवड  बुद्धिबळ स्पर्धा जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य




कोल्हापूरचा प्रणव पाटील उपविजेता, रेंदाळ चा श्रीराज भोसले तृतीय


कोल्हापूर 17 सिटी न्यूज नेटवर्क

- कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने कोल्हापूर चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा वरिष्ठ खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज पार पडल्या. अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत अंतिम सातव्या फेरीनंतर दिव्या पाटील जयसिंगपूर, प्रणव पाटील कोल्हापूर, श्रीराज भोसले रेंदाळ, आदित्य सावळकर कोल्हापूर व रवींद्र निकम इचलकरंजी या सर्वांचे समान सहा गुण झाल्यामुळे सरस बकोल्झ् टायब्रेक गुणानुसार जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने बाजी मारली व अजिंक्यपद पटकाविले तर कोल्हापूरचा प्रणव पाटील उपविजेता ठरला.रेंदाळ च्या श्रीराज भोसले ला तृतीय व कोल्हापूरच्या आदित्य सावळकर ला चौथे स्थान मिळाले तर इचलकरंजीच्या रवींद्र निकमला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रसिद्ध सनदी लेखापाल सतीश डकरे,धनंजय इनामदार,शरद पाटील व धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर,धीरज वैद्य,आरती मोदी,महेश व्यापारी व नयन पाटील उपस्थित होते..

दिव्या पाटील, प्रणव पाटील, श्रीराज भोसले व आदित्य सावळकर या चौघांची निवड जळगाव येथे 20 ते 23 जुलै दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात झाली आहे.या चौघांना अनुक्रमे 1000/-,700/-,500/- व 300/- रोख रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

Comments