महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर तर्फे एकाच वेळी पंधरा शाखांच्या उदघाटनांचा सोहळा मोठया दिमाखात पार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर तर्फे एकाच वेळी पंधरा शाखांच्या उदघाटनांचा सोहळा मोठया दिमाखात पार
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे नाका तिथे शाखा या ध्येयधोरणानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर तर्फे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांचे अध्यक्षतेखाली एकाच वेळी पंधरा शाखांच्या उदघाटनांचा सोहळा मोठया दिमाखात पार पडला.
सर्वसामान्य जनतेला उद्भवणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच प्राप्त पूरस्थिती मध्ये गंभीर अवस्था निर्माण झाल्याने सर्वसामान्य जनतेला मदतीचा आधार देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर मध्ये प्रथमच एकाच वेळी होणाऱ्या या पंधरा शाखांच्या उदघाटन समारंभाच्या निमित्ताने मनसे कोल्हापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक सळसळतं नवचैतन्य निर्माण झालेले असून प्रचंड जल्लोषात व उत्साहात सर्व शाखांचे उदघाटन समारंभासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धूम्मा, शहर सचिव निलेश आजगांवकर , शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, सुरज कानूगडे , शिवराज भोसले,कामगार सेना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, विध्यार्थी सेना अध्यक्ष अजिंक्य शिंदे, अभिजीत संकपाळ , सुनील तुपे , उत्तम वंदुरे, प्रसाद साळुंखे, चंद्रकांत सुगते , रणजीत वरेकर, विभाग अध्यक्ष राहूल पाटील, अमित साळुंखे, संग्राम सावंत, सागर साळोखे, बाजीराव दिंडोर्ले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजरोजी नाका तिथे शाखा मोहिमेअंतर्गत १५ शाखा उद्घाटन सोहळ्यास टेंबलाई नाका, बीएसएनएल टॉवर येथून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर मनसेच्या सर्व शाखांचे उदघाटन करण्यात आले. असे पत्रक शहर सचिव निलेश आजगावकर यांनी प्रसिद्धीस दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना , कोल्हापूर शहरतर्फे खालील पंधरा ठिकाणी शाखांची उदघाट्ने पार पडली.
१ ) टेंबलाई नाका बीएसएनएल टॉवर चौक
२ ) कळंबा नाका साई मंदिर चौक कोल्हापूर
३ ) छत्रपति संभाजी नगर स्टँड रोड कळंबा फिल्टर हाऊस चौक कंपाऊंड जवळ कळंबा रोड कोल्हापूर . ..
४ ) क्रांतिसिंह नाना पाटील नगर, मगदुम किराणा दुकान शेजारी
५ ) नवीन वाशी नाका, सिग्नल चौक
६ ) जुना वाशी नाका शाखा, देवकर पाणंद पेट्रोल पंपा जवळ
७ ) शाहुपुरी कंभार गल्ली आर्यनविन ख्रिचन हायस्कुल शेजारी जयंती नाल्या शेजारी
८ ) फुलेवाडी नाका भगवा चौक
९ ) कावळा नाका प्रार्थना हॉटेल रिक्षा स्टॉप जवळ
१० ) दाभोळकर कॉर्नर सिग्नल चौक
११ ) कळंबा ग्राम पंचायत समोर
१२ ) ताराबाई पार्क किरण बंगला जवळ
१३ ) सावित्रीबाई फुले चौक सावित्रीबाई फुले हॉस्पिटल शेजारी
१४ ) महाराजा चौक हॉटेल महाराजासमोर सिग्नल जवळ रुईकर कॉलनी
१५ ) लक्षतीर्थ वसाहत ,टेंबलाई नाका, कोल्हापूर
टेंबलाई मंदीर परिसर
Comments
Post a Comment