हील रायडर्सची दुसरी पावनखिंड मोहीम यशस्वी

 


हील रायडर्सची दुसरी पावनखिंड मोहीम यशस्वी

1100 शे च्या वर मोहिमविरांचा उस्फुर्त सहभाग



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क

जुलै महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यातील शिवप्रेमी व निसर्गप्रेमी मंडळींना वेध लागतात ते कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पदभ्रमंती मोहिमेचे


1660 सालच्या जुलै महिन्यामध्ये याच मार्गावर स्वराज्य रक्षणार्थ घडलेले ऐतिहासिक युद्ध 361 वर्षानंतर ही आम्हाला वृद्धांच्या म्हणी राष्ट्रभक्तीची स्फूर्ती जागवते त्यांच्या अंगी शिव ऊर्जा निर्माण करते इथे घडलेला शौर्यशाली इतिहास जवळून अनुभवण्याची ही मोहीम कोल्हापूरच्या हील रायडर्स ग्रुपने 39 वर्षांपूर्वी सुरू केली ती सातत्याने सुरू आहे आज पर्यंत हजारो युवक युतीने यामध्ये सहभाग नोंदवला आहे

आज पर्यंत 66 मोहिमा पार पडल्या आहेत

चालू सालची दुसरी मोहीम 22 व 23 जुलै रोजी यशस्वी पार पडली सदर मोहिमेमध्ये महाराष्ट्र व आधी राज्यातून अकराशेच्यावर युवक युतीने सहभाग घेतला

मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा रस्त्यावरील चिखल दगड गोटे निसरडी पायवाट अशा खडतर मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव असा  जयघोष करीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोहीम वीरानी मोहीम यशस्वी केली

पावनखिंडीच्या युद्धभूमीमध्ये घडलेल्या रणसंग्रामामध्ये स्वराज्यरक्षणार्थ प्राणाची आहुती देणाऱ्या वीर शिवा काशीद नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे बांदल सेना व ज्ञात अज्ञात नरवीरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे,शंभुराजे मंच अध्यक्षा शीतल ढोली, मनोज पाटील, इतिहास अभ्यासक राहुल नलवडे रायबा शिवदुर्ग फाउंडेशन राजेश इंगळे डॉक्टर किरण भिंगार्ड सीएम फेलो आचल बागडे यांच्या व मोहीमवीरांच्या हस्ते पूजन करण्यात आले

यावेळी ऋतुराज राणे या इतिहास प्रेमी युवकाने येथे घडलेल्या इतिहासाची कथन केले त्यानंतर ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र झाल्यानंतर शिवरायांच्या जयघोषाने पावनखिंडीचा परिसर दणाणून गेला

सर्वात लहान व सर्वात वयस्कर यांनी पदभ्रमंती यशस्वी केल्याबद्दल सुरज ढोली यांच्या स्मरणार्थ सूर्ज ऊर्जा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

कोल्हापूर जिल्हा प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांचे प्लास्टिक मुक्त प्रदूषण मुक्त हा मार्ग रहावा यासाठी बहुमूल्य सहकार्य लाभले एस टी महामंडळ आरोग्य विभाग स्थानिक ग्रामस्थ पोलीस दल यांचे सहकार्य लाभले मोहीम पूर्ण झाल्यानंतर सहभागी ना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी संमती मिरजे किरण शहा हेमंत शहा महबूब मुजावर विनोद कंबोज ऋषिकेश केसकर हजर होते

 अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली च्या 120 युवक युवती शिलेदारांनी अहोरात्र कष्ट घेऊन सदरचे मोहीम पार पाडली

Comments