डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या द्वितीय फेरीस देशभरातून 134 खेळाडू सहभागी

 डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या द्वितीय फेरीस  देशभरातून 134 खेळाडू सहभागी






 -  रविवारी कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय  कौशल्य पाहण्याची संधी                     

  कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क

 येथील  मोहिते रेसिंग ऍकॅडमीच्या ट्रॅकवर एमआरएफ डर्ट ट्रॅक एफएमएससीआय नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेची दुसरी  फेरी संपन्न होत आहे .. आज या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची कागदपत्रं आणि वाहनांची तपासणी झाली. तसंच सहभागी स्पर्धकांनी आज या ट्रॅकवर सराव केला. रविवारी दिवसभर राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेची  पाच पैकी दुसरी फेरी  संपन्न होणार आहे.या स्पर्धेत म्हैसूर आलेल्या  नऊ वर्षीय मोहम्मद अरमान सह कोईमत्तूर बंगलोर इथून आलेल्या साठ वर्षे अशा तीन पिढ्यातील तील सहभाग हे मोठे आकर्षण आहे .



या स्पर्धा गॉड स्पीड रेसिंग, मोहिते रेसिंग ऍकॅडमी आणि कोल्हापूर मोटर स्पोर्टच्या पुढाकारातून कोल्हापुरातील मोहितेज रेसिंग ऍकॅडमीच्या ट्रॅकवर एमआरएफ डर्ट ट्रॅक एफएमएससीआय नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीचं आयोजन करण्यात आलंय. कर्नाटक, दिल्ली, बडोदा, चंदीगड, केरळा, बेंगलोर, चेन्नईसह मुंबई नाशिक, पुणे, गोवा इथले १२५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. आज या स्पर्धकांची कागदपत्रं, रँकींग, त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. दुपारनंतर सर्वच रेर्ससनी ट्रॅकवर सराव केला. परराज्यातील स्पर्धकांसोबतच कोल्हापुरातील मृण्मयी चौगुले, पुष्कर घोरपडे या युवा रेसर्सचा समावेश आहे.        



             रविवार १३ ऑगस्टला नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिपची दुसरी फेरी संपन्न होणार आहे. स्पर्धकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, सुरक्षित आणि नियंत्रीत वातावरण देणं हा या स्पर्धेचा उद्देश असून स्थानिक प्रेक्षक - डर्ट रेस प्रेमीनी यांचा लाभ घ्यावा असे आहवान स्थानिक समन्वयक अभिषेक मोहिते - कोल्हापूर मोटार स्पोर्टस् चे योगेश कागले - रॉयल चे जयदीप पवार यांनी केले आहे . या स्पर्धेत डर्ट ट्रॅक, फ्लॅट ट्रॅक, स्कुटर क्लास, सुपर क्रॉस, मोटो क्रॉस आणि रॅली असे रेसिंगचे विविध प्रकार या ट्रॅकवर संपन्न होणार आहेत. गॉड स्पीड च्या शाम कोठारी यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची दुसरी फेरी कोल्हापुरात होत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रॉयल रोडीओचे जयदीप पवार, कोल्हापूर मोटर स्पोर्टसचे योगेश कागले व त्याचे ४० हून अधिक सहकारी कार्यरत आहेत. 

Comments