सुभेदार चित्रपट 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभर प्रदर्शित

सुभेदार चित्रपट 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभर  प्रदर्शित







कोल्हापूर २३ (प्रमोद पाटील) सिटी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या शिवकालीन प्रत्येक पान मराठ्यांच्या अतुलनीय शौर्याने भरलेला आहे . सुभेदार तानाजी मालुसरेच्या कोंढाणा वरील पराक्रम ही अद्वितीय सुवर्णकथा 25 ऑगस्ट ला संपूर्ण जगभर प्रदर्शित होणाऱ्या सुभेदार या मराठी चित्रपटातून   आपल्यासमोर उलगडणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज कोल्हापुरात पत्रकाराच्या समोर दिली. 

सुभेदारांची अभंग स्वामिनिष्ठा दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपत्याच्या तलवारीची साथ या सगळ्यांचे दर्शन आपल्याला या चित्रपटातून होणार आहे लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी आधीच्या फर्जद फसते शिकस्त पावनखिंडचे शेर शिवराज या चित्रपटांच्या जबरदस्ती यशातून त्यांची या विषयावरची आपली कमाल जी पकड सिद्ध केली आहे 

सुभेदार चित्रपटाला टीझर ट्रेलर गाण्यामधून प्रेक्षकांची उत्सुकता आदेश शिगेला पोहचली आहे. 
सुभेदार हा चित्रपट देशांबरोबर ६ विविध देशामध्ये एकाच वेळी 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

या पत्रकार परिषदेला या चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

Comments