महाराष्ट्रातील शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी जिओचे महत्त्वपूर्ण पाउल : छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे ट्रू 5G सेवा सुरू

 महाराष्ट्रातील शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी जिओचे  महत्त्वपूर्ण पाउल : छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे ट्रू 5G सेवा सुरू 



सातारा 23 सिटी न्यूज नेटवर्क

 जिओने आपली ट्रू  5G सेवा रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे सादर  केली  आणि  शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या लॉन्चसह, जिओ   च्या 5G अमर्यादित सेवांचा आनंद महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सुमारे 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी घेऊ शकतात.


महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना, जिओचे श्री सुनील गोसावी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सिटीओ),  महाराष्ट्र आणि गोआ यांनी 5G चे असंख्य फायदे आणि शक्यता विशद केल्या आणि इंटरनेट वापरात क्रांती घडवून आणण्यासाठी, नाविन्यपूर्ण वातावरण, सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण कशी करता येईल यांवर भर दिला.


जिओ  चे ट्रू  5G तंत्रज्ञान भारतातील शिक्षण बदलण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. जलद आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी प्रदान करून, जिओ  ट्रू 5G विद्यार्थ्यांसाठी एक वर्धित शिक्षण अनुभव सक्षम करते आणि शिक्षक सदस्यांना त्यांचे सर्वोत्तम ज्ञान   वितरण करण्यास सक्षम करते. जसजसे अधिक शैक्षणिक संस्थांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे, तसतसे देशातील शैक्षणिक परिघामद्धे क्रांती घडवून आणण्याची क्षमता,  ज्ञानाची देवाणघेवाण, नावीन्य आणि सहयोग यासाठी अनंत शक्यता अनलॉक करता  येणे सहज शक्य होणार आहे . संपूर्ण भारतातील कॅम्पस डिजिटल करण्याबाबत जिओची वचनबद्धता शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पुढील पिढीसाठी उज्वल भविष्य घडवण्याच्या आपल्या समर्पणाची याद्वारे  पुष्टी करते. आपल्या 5G  तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात कसा जास्तीत जास्त वापर करता येईल हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे . 


या प्रक्षेपणाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, युथ पास कार्यक्रम सुरू करण्यात आला जो विद्यार्थ्यांना रिलायन्सद्वारे ऑफर केलेले अनेक विशेष फायदे देतो. व्हर्च्युअल रिअॅलिटी गॅजेट्सचाही अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला; त्यांच्या इन्स्टा क्षणांसाठी यावेळी फोटो बूथ उभारले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनासह करिअरच्या शक्यता, उद्योग वापर आणि ग्राहक अनुभव यावर विस्तृतपणे प्रश्नोत्तरांच्या सत्रात चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल कुमार वावरे आणि उपप्राचार्य डॉ रामराजे माने देशमुख, विविध विभागांचे प्रमुख आणि जिओ महाराष्ट्रचे अधिकारी उपस्थित होते.

Comments