78 लाख रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान दोन तीन दिवसात वितरित होणार : बी आर एस पक्षाच्या पाठपुराव्याला आणि मागणीला यश



78 लाख रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान दोन तीन दिवसात वितरित होणार : बी आर एस पक्षाच्या पाठपुराव्याला आणि मागणीला यश



कोल्हापूर दिनांक ३० सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्ह्यातील अंदाजे सहाशे शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान प्रलंबित होते. महाराष्ट्रामध्ये 80 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याच्या अनुषंगाने परिपत्रक निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन 11 ऑगस्ट रोजी बी आर एस पक्षाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी श्री दत्तात्रय दिवेकर यांना देण्यात आले होते व महिना अखेरपर्यंत अनुदान वितरित न झाल्यास एक सप्टेंबर रोजी मोर्चा काढून कार्यालय बंद पाडण्याचा व टाळे ठोकण्याचा  इशारा देण्यात आला होता .


या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाली केल्या तसेच बी आर एस पक्षाच्या वतीने संजय पाटील यांनी कृषी आयुक्त मंत्रालय असा पाठपुरावा केला त्यामुळे कोल्हापुरातील शेतकऱ्यांना 78 लाख रुपये ठिबक सिंचन अनुदानापोटी दोन-तीन दिवसात मिळणार आहेत त्याचा शेकडो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे सदरचे अनुदान दोन ते तीन दिवसात वाटू असे आश्वासन आज श्री दत्तात्रय दिवेकर यांनी आम्हाला दिलेले आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे गडहिंग्लज मधील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे

सदरचे प्रसिद्धीपत्रक बी आर एस पक्षाचे नेते संजय पाटील जिल्हा समन्वयक नवाज बशु ,दिलीप चव्हाण, संग्राम जाधव ,साकेत राज देशमुख ,भीमराव पाटील ,विक्रम जरग यांच्यावतीने प्रसिद्धीस दिले आहे


Comments