भाजपा नवमतदार नोंदणीला उत्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर दि.२८ सिटी न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जात असतात. याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले. नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख १६ चौकामध्ये २५, २६, २७ ऑगस्ट रोजी झालेल्या या अभियानाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने भगवा चौक, लाईन बाझार चौक, महाराजा हॉटेल चौक, व्हीनस कॉर्नर, सावित्रीबाई फुले रुग्णालय, धर्मवीर संभाजीराजे चौक (दीपक वडा शेजारी), सायबर चौक, साईक्स एक्स्टेंशन, टेंबलाईवाडी चौक, शाहू बँक चौक, साई मंदिर कळंबा, उभा मारुती चौक, सानेगुरुजी वसाहत, गंगावेश चौक, रेणुका मंदिर लक्षतीर्थ वसाहत अशा ठिकाणी मंडप उभारून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये नवमतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले. अनेक नवमतदारांनी या अभियानाचा लाभ घेतला. खासदार धनंजय महाडिक व भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक यांनी प्रमुख पदाधिका-यांसह या सर्व ठिकाणी भेट देऊन नोंदणी कक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले तसेच युवा नवमतदारांनी आपली मतदान नोंदणी करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले.
वरील सर्व ठिकाणी किसन खोत, धीरज पाटील, आशिष कपडेकर, उमा इंगळे, अतुल चव्हाण, सचिन तोडकर, अभिजित शिंदे, आजम जमादार, अनिल कोळेकर, राजेंद्र वडगावकर, अभय तेंडूलकर, संग्राम जरग, संजय सावंत, सचिन बिरंजे, बालाजी चौगले, रवींद्र मुतगी, डॉ राजवर्धन, सुधीर देसाई, गिरीष साळोखे, रमेश दिवेकर यांनी प्रत्येक्ष नवमतदार नोंदणी बूथवर काम पाहिले.

Comments
Post a Comment