हुतात्मा निवृत्ती गोविंद आडूरकर चॅरिटेबल ट्रस्ट वतीने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न

 हुतात्मा निवृत्ती गोविंद आडूरकर चॅरिटेबल ट्रस्ट वतीने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न 




कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क

09 ऑगस्ट क्रांती दिन व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिनाचे औचित्य साधून ट्रस्ट मार्फत दिल दोस्ती दुनियादारी या कराओके संस्थेकडून देश भक्ती गीत व हिंदी गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन 18 ऑगस्ट 2023 शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजत केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर या ठिकाणी पार पडले


देश सेवेसाठी बलिदान दिलेले निवृत्ती आडूरकर आजही सर्वांच्या समरणार्थ आहेत. त्यांच्या कार्याने आजही समाजामध्ये त्यांच्या देश सेवेच्या कार्याचे बीज त्यांच्या कुटुंबीय कडून रोवले जाते.

 नेहमीच सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी संस्था या लोककलेच्या माध्यमातूनही लोकसेवेत उतरलेले आहे. कार्यक्रमानिमित्त समाजामध्ये कार्यरत असणारे सामाजिक सेवा बजावणारे  तसेच हुतात्मा झालेले चे परिवार व स्वातंत्र्यसैनिक यांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्त पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेश सचिव माननीय महेश जाधव तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणारे पी के पाटील आण्णा, विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय संतोष पांचाळ सांगली कार्याध्यक्ष अनिल लोहार पणजी गोव्याचे उद्योजक शिवाजी सुतार सखाई फाउंडेशन बहुद्देशीय सेवाभावी संस्था पाचगाव कोल्हापूर या संस्थेचे सर्व पदाधिकारी विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनिल चव्हाण तसेच हुतात्मा निवृत्ती यांच्या वारसदार कुटुंबीयांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दिली.

तसेच हुतात्मा व शहीद झालेले यांचे परिवार या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित राहिले

 ट्रस्टच्या माध्यमातून हुतात्मा फिरगुजी शिंदे गिरगाव यांचे कुटुंबीय, ताम्र पत्राने सन्मानित असलेले गणपती ज्ञानोबा चिकोडे यांचे कुटुंबीय, संजय दत्तात्रय पार्ले माजी पोलीस उपनिरीक्षक मुंबई, तसेच इतर स्वतंत्र सैनिक यांचा सन्मान सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन दिमाखदार सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्त पार पडला.

अशा प्रकारे समाजामध्ये कार्य करणाऱ्या तसेच हुतात्मा,शहीद व स्वातंत्र्य सैनिकाची नोंद घेऊन त्यांच्या परिवाराचा सन्मान केल्याचा आनंद व अभिमान असल्याचे मत माननीय महेश जाधव यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.

 निवृत्ती आडुरकर यांनी दिलेल्या योगदानाची संपूर्ण माहिती ट्रस्टचे सेक्रेटरी तानाजी पाटील यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.

 या सर्व कार्यासाठी सर्व मित्र परिवार तालीम संस्था सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वांनी योगदान देऊन कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे ट्रस्ट च्या अध्यक्षा भारती आडुरकर यांनी आभार व्यक्त केले. भविष्यातही मिळालेल्या निवडून समाजसेवेसाठी कायम तत्पर राहणार असल्याचे मत यावेळी अध्यक्ष भारती आडुरकर यांनी बोलून दाखवले.

Comments