एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

 एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन



कोल्हापूर (मळगे बुद्रुक) ३० सिटी न्यूज नेटवर्क 


प्रशासकीय सेवांमध्ये यश संपादन करून तरुणांनी समाज परिवर्तनाच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडावेत, असे आवाहन सांगली जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे  यांनी केले.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवामध्ये संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारीसाठी मळगे बुद्रुक येथील  मळगे विद्यालय जुनियर  कॉलेजमध्ये यूपीएससी व एमपीएससी मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रा मध्ये सर्व शिक्षक हे पुण्यमधील नामांकित संस्थांमधून येणार आहेत..

या केंद्राचे उदघाटन सांगली जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  मळगे शिक्षण मंडळाचे सचिव आनंदराव अस्वले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी पंचायत   समिती कागलचे गटविकास अधिकारी  सुशील संसारे,  आदमापूर देवस्थानचे प्रशासक शिवराज नायकवडे, पंचायत समिती कागलचे गटशिक्षणाधिकारी जी.बी. कमळकर,कराड पंचायत समितीचे अधीक्षक एम.बी.राजमाने,आदमापूरचे  ग्रामसेवक पवन बोंगार्डे मळगे विद्यालयाचे मुख्याध्यापक ए एम पाटील एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख मयुर राजमाने  उपस्थित होते.




ज्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना पुण्या मध्ये मिळतात त्या इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून गरीब, ,होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रम कायम राबविले जातील.

या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी होऊन सामाजिक व वैयक्तिक प्रगती करावी.असे मत एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख मयुर राजमाने यांनी केले.         



 1ते 3 सप्टेंबर,शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी रोज 10 वाजता मळगे विद्यालय येथे पुण्यातील नामांकित संस्थांमधील  प्राध्यापकांची मोफत डेमो लेक्चर्स होणार आहेत.त्याचा लाभ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मळगे शिक्षण मंडळाने केले आहे.

Comments