दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

मंगळवार, ८ ऑगस्ट २०२३. 







अधिक श्रावण कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज चांगला दिवस आहे. 


चंद्रनक्षत्र - भरणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू, बुध, मंगळाशी शुभ योग् आहे. महत्वाचा दिवस आहे, वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा सांभाळा. वाहनापासून त्रास संभवतो.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. घशाचा त्रास जाणवेल. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरी, व्यवसायात उत्कर्ष होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. अचानक लाभ संभवतात.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) यशस्वी दिवस आहे. दूरचे प्रवास घडतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. मात्र खर्च देखील वाढतील.

 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. चिंता दूर होतील. नैतिक मार्ग सोडू नका.

  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शत्रू पराभूत होतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. नवीन यंत्र खरेदी होईल. नोकरीत त्रास संभवतो.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरीत यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. कोर्टात यश.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संततीकडून शुभ समाचार समजतील. शेअर्स मधून लाभ होतील. यात्रा घडेल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) स्थावर मालमत्ता वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वैचारिक मंथन घडेल. नवीन माहिती समजेल. उत्तम आर्थिक लाभ होतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक धनलाभ होईल. येणी वसूल होतील. शेअर्स मध्ये मात्र सांभाळून निर्णय घ्या.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments