महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा : मुलामध्ये स्वराज मिश्रा व लक्ष दिघे तर मुलीमध्ये गिरीषा पै आघाडीवर
महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा : मुलामध्ये स्वराज मिश्रा व लक्ष दिघे तर मुलीमध्ये गिरीषा पै आघाडीवर
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
- चेस असोसिएशन कोल्हापूरने पोदार इंटरनॅशनल स्कूल नवा वाशी नाका कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या सात वर्षाखालील मुला मुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीनंतर मुलींच्या गटात मुंबईची गिरीषा पै सहापैकी सहा गुण घेऊन आघाडीवर आहे.मुलांच्या गटात अग्रमानांकित नागपूरचा स्वराज मिश्रा व मुंबईचा लक्ष दिघे हे दोघेजण साडेपाच गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने व पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने चेस असोसिएशन कोल्हापूरने या स्पर्धा आयोजित केले आहे. आयुर्विमा महामंडळ,अयोध्या फाउंडेशन कोल्हापूर, बँक ऑफ महाराष्ट्र व एस्.बी.रिसेलर्स यांनी या स्पर्धा पुरस्कृत केल्या आहेत. स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात होणारी ही स्पर्धा उद्या सोमवारी दुपारी एक वाजता संपणार आहे.त्यानंतर लगेच स्पर्धेचा बक्षीस समारंभ आहे.महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे,आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र पाटेकर व अयोध्या फाउंडेशनचे युवा उद्योजक उत्तम पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात येणार आहे.
आज झालेल्या सहाव्या फेरीचे उद्घाटन अँकॉलॉजिस्ट डॉक्टर अश्विनी माने-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सहाव्या फेरीत मुलींच्या गटात पहिल्या पटावर पाच गुणासह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या गिरीषा पै ने मुंबईच्या अनिष्का बियाणीचा पराभव करून सहा गुणासह निर्विवादपणे आघाडी घेतली आहे.अग्रमानांकित नंदुरबारची नारायणी मराठे व ठाण्याची त्विशा नोविन, या दोघी पाच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.चंद्रपूरची आबा फाल्के व नंदुरबारची भूमी धगधगे या दोघी साडेचार गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.मुलांच्या गटात पहिल्या पटावर मुंबईच्या लक्ष दिघेने पाच गुणासह आघाडीवर असलेल्या ठाण्याच्या दर्श राऊत चा पराभव केला व साडेपाच गुणासह संयुक्तपणे आघाडी घेतली आहे.दुसऱ्या पटावर अग्रमानांकित नागपूरच्या स्वराज मिश्राने नागपूरच्याच रिधान अगरवालचा पराभव करून साडेपाच गुणासह संयुक्तपणेे आघाडी घेतली.दर्श राऊत ठाणे,अर्णव कुंचलवार नागपूर, गोरक्ष खंडेलवाल पुणे, विठ्ठल नारायणन ठाणे व निवान कदम मुंबई, हे पाच जण पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.नोवा अय्यर जुएल मुंबई, हेयान रेड्डी पुणे व विहान शहा पुणे हे तिघेजण साडेचार गुणासह साडेच संयुक्तपणेे तृतीय स्थानावर आहेत.
Comments
Post a Comment