महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील निवड बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात प्रारंभ
संयम,एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बुद्धिबळ खेळण्याचा फायदा - डॉक्टर चेतन नरके
कोल्हापूर दि. 25 सिटी न्यूज नेटवर्क
पोदार इंटरनॅशनल स्कूल नवा वाशी नाका कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या.मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर, औरंगाबाद,नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड,नंदुरबार, अकोला व स्थानिक कोल्हापूर,इचलकरंजी येथील नामवंत 116 बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक व थायलंड चे वाणिज्य सल्लागार , डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आले..यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या उपप्राचार्य मनीषा अमराळे,कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, या स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पुण्याचे नितीन शेणवी, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर, समन्वयक धीरज वैद्य,आरती मोदी, करण परीट, सूर्याजी भोसले, रोहित पोळ, पोदार स्कूलचे व्यवस्थापक सुरेश देसाई, क्रीडा समन्वयक संजय चिले,उदय पाटील व अभिजीत परब व्यासपीठावर उपस्थित होते.
चेस असोसिएशन कोल्हापूरने जिल्हा,राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुणांकन अशा विविध बुद्धिबळाच्या स्पर्धा घेऊन चांगले सातत्य राखले आहे ,असे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे म्हणाले. खेळामुळे विविध सुप्तगुणांचा विकास होतो बुद्धिबळामुळे विशेषकरुन संयम,एकाग्रता,तर्कसुसंगती व स्मरणशक्ती वाढते. विश्वनाथ आनंद,कोनेरू हम्पी,हरिका प्रज्ञानंद,डी.गुकेश या भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारताचा नावलौकिक वाढवला आहे..भारताची बुद्धिबळात महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.असे डॉक्टर चेतन नरके यांनी उद्घाटन प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर मुलींच्या गटात अग्रमानांकित नंदुरबारची नारायणी मराठे, द्वितीय मानांकित नागपूरची स्वरा बोरखडे, ठाण्याची त्विशा नोवीन, मुंबईच्या अनिश्का बियाणी व गिरिषा पै या पाच जणी तीन गुणासह संयुक्तपणेे आघाडीवर आहेत.मुलांच्या गटात द्वितीय मानांकित पुण्याचा निवान अगरवाल, ठाण्याचा दर्श राऊत, पुण्याचा आयुष जगताप, मंतिक अय्यर पुणे, गोरक्ष खंडेलवाल पुणे कनिष्क इंदुरकर चंद्रपूर व विहान शहा पुणे हे सात जण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
Comments
Post a Comment