शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनींचे 'ढिंच्यॅक' स्वागत
कोल्हापूर (तिटवे )दि.३० सिटी न्यूज नेटवर्क
मनसोक्त धम्माल करण्याचं आणि त्यांत सीनिअर्सनीही आपल्या वाटची मजा करून घेण्याचं निमित्त म्हणजे महाविद्यालयातील 'फ्रेशर्स पार्टी'. अशाच फ्रेशर्स पार्टीतून तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थिनींचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. भन्नाट थीम, डीजेच्या ठोका, कॅटवॉक, डान्स आणि वेगवेगळ्या फनी गेम्समुळे विद्यार्थिनींनी या पार्टीत धम्माल केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. याप्रसंगी प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. येत्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी आणि भविष्यातील यशासाठी विद्यार्थिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. वेगवेळ्या खेळांमध्ये विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. डीजेच्या ठेक्यावर डान्स करत विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची मजा लुटली.
याप्रसंगी उपप्राचार्य सागर शेटगे सर्व विभाग प्रमुख शिक्षकवृंद आणि विद्यार्थीनी उपस्थितीत होत्या. सूत्रसंचालन सफीया तांबोळी आणि सानिका मोरबाळे यांनी केले. आभार प्रा. काजल बलूगडे यांनी मानले.
Comments
Post a Comment