सातारा येथे एसएनडीटी युवा महोत्सवात कोल्हापूरच्या शहीद च्या विद्यार्थिनींची 15 पदकांची कमाई

 सातारा येथे एसएनडीटी युवा महोत्सवात कोल्हापूरच्या शहीद च्या विद्यार्थिनींची 15 पदकांची कमाई



तिटव्याच्या महाविद्यालयात  कला विभागात जनरल चॅम्पियनशिप मिळाल्याबद्दल विद्यार्थिनींचा  सत्कार

कोल्हापूर (तिटवे) 18 सिटी न्यूज नेटवर्क 

              एस.एन.डी टी.महिला विद्यापीठ ,मुंबई मार्फत दि 9 आणि 10 सप्टेंबर रोजी युवा  महोत्सवाचे आयोजन बीसीए कॉलेज सातारा येथे करण्यात आले होते .त्यामध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भरघोस असे यश संपादन केले आहे. त्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

संस्थेचे मुख्य मार्गदर्शक व आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञ डॉ . जगन्नाथ पाटील  म्हणाले ' अभ्यास, प्लेसमेंट, नोकरी या सोबतच वेगवेगळ्या कला-क्रीडा प्रकारांमध्येही विद्यार्थिनी चमकत आहेत. अशाच प्रकारच्या अष्टपैलू विद्यार्थिनी घडविण्याचा प्रयत्न शहीद शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने करत आहे.'  

 भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, सोशल मीडिया जनजागृती ,ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थिनींनी सुंदर सादरीकरण केले. युवा महोत्सवामध्ये यश संपादन केलेल्या महाविद्यालयीन  विद्यार्थिनींचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाहू कॉलेज कोल्हापूर चे माजी प्राचार्य व्ही व्ही किल्लेदार, तिटवे गावचे प्रतिष्ठित नागरिक रंगराव किल्लेदार, अखिल भारतीय मराठा सेवा संघ कोल्हापूर शहर अध्यक्षा         सरिता चौगले, बी न्यूज कोल्हापूरचे प्रोग्रामिंग हेड सागर चौगले उपस्थित होते.


                 

   या स्पर्धेमध्ये मराठी वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक, तसेच लोकनृत्य,हिंदी वादविवाद स्पर्धा, मूकनाट्य,लघुनाट्य  या कला प्रकारात द्वितीय तर पथनाट्य या कला प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक कलाप्रकारांमध्ये मराठी वकृत्व स्पर्धेमध्ये मयुरी कांबळे प्रथम पारितोषिक,हिंदी वकृत्व स्पर्धेमध्ये स्नेहा मगदूम प्रथम पारितोषिक ,इंग्रजी वकृत्व स्पर्धेमध्ये रुबीना डिसोजा द्वितीय पारितोषिक, मराठी कविता सादरीकरण स्पर्धेमध्ये दिक्षा चांदणे प्रथम पारितोषिक, हिंदी कविता सादरीकरण स्पर्धेमध्ये सफिया तांबोळी प्रथम पारितोषिक, मराठी निबंध स्पर्धेमध्ये अंजली चांदणे प्रथम पारितोषिक, इंग्रजी निबंध स्पर्धेमध्ये रुबीना डिसोजा द्वितीय पारितोषिक,रांगोळी स्पर्धेमध्ये तृप्ती उणे तृतीय पारितोषिक, स्पॉट फोटोग्राफी पौर्णिमा पाटील द्वितीय पारितोषिक मिळविले आहेत. 

                  अशा विविध कलाप्रकारांमध्ये महाविद्यालयाने 15 पारितोषिके  मिळविले आहेत.वैयक्तिक कला प्रकारांमध्ये जनरल चॅम्पियनशिप महाविद्यालयास मिळाली आहे. हया विभागीय फेरीत विजेते ठरलेल्या महाविद्यालयाच्या संघांची मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठ पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. 


विद्यार्थीनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील,शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, परीक्षक मंगेश कांबळे, युवराज डावरे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Comments