'क्षमा ' विषयी प .पू . नियमसागर मुनीच्या अमृतवाणी प्रवचनासह दशलक्षण परिपुर्ती : आर के नगर येथे शनिवारी ' विध्याधर ते विध्यासागर महानाट्याचे प्रतिमा विद्या प्रतिष्ठान वतीने आयोजन
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क -
गेली दोन आठवडे प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात पाच एकर परिसरात उभारण्यात आलेल्या कलामंडपामध्ये दशलक्षण पर्वाची भक्तीमय वातावरणात सांगता झाली . आज सकाळ सत्रात परमपूज्य नियम सागर जी महाराज यांच्या अमृतवाणीने क्षमा विषय झालेल्या प्रवचनातून ' क्षमाशील ' असणे हे प्रत्येकाचे भूषण असल्याचे त्यांनी अधिकार वाणीने सांगितले . यांच्यासह पवित्र सागर जी महाराज , वृषभसागरजी महाराज , अभिनंदन सागरजी महाराज , सुपार्श्व सागरजी महाराज , श्रुतमती माजाजी , समनामती माताजी , शुल्लक संयमसागर जी आदि ची प्रेरक उपस्थिती या दरम्यान होती . गत दहा दिवसात षोडशकरण सह .क्षमा - मार्दव - आर्जव - शौच - सत्य - संयम - तप - त्याग - आकिंचन्य - ब्रम्हचार्य या दशलक्षणा विविध पैलू नी त्यागी - व्यासंगी मुनीजन आपल्या अधिकार वाणी दारे विवेचन केले . प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेली तीन महिन्यांमध्ये अधिक काळ अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीय सचिन बहिर शेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले - ए के कामते - राजु शेठे यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्या समावेत कार्यरत आहे
शनिवारी सांयकाळी महानाट्य
शनिवारी30 सप्टेंबर रोजी सायंकाळी या ठिकाणी विद्याधर से विद्यासागर हे महानाट्य होणार असून यामध्ये सांगलीतील ५० हून अधिक कलाकाराचा संघ आपली कला सादर करणार आहे या महानाट्याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकुंटुंब - सह परिवार भेट देऊन आध्यात्मिक अनुभव घ्यावा असे आहवान संयोजक प्रतिमा विघा प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment