नीता अंबानी यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने प्रतिष्ठित ‘सिटिझन ऑफ मुंबई २०२३-२४’ पुरस्कार

 नीता अंबानी यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने प्रतिष्ठित ‘सिटिझन ऑफ मुंबई २०२३-२४’ पुरस्कार 






मुंबई २७ सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने प्रतिष्ठित ‘सिटिझन ऑफ मुंबई २०२३-२४’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. परिवर्तन संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे.


नीता अंबानी या इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सच्या मालक आहेत. त्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. या कंपनीनं इंडियन सुपर लीग सुरू केली होती. त्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल इनिशिएटिव्हच्याही प्रमुख आहेत. मेजर क्रिकेटच्या पहिल्या सीझनची विजेती टीम एमआय न्यूयॉर्कच्याही त्या मालक आहे. ही एक व्यावसायिक अमेरिकन टी २० लीग आहे

Comments