इंडियन आयडॉलचा होस्ट म्हणून हुसैन कुवाजेरवालाचे पुनरागमन; शो सुरू होणार 7 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता
मुंबई २५ सिटी न्यूज नेटवर्क
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोने देशातील संगीत उद्योगाला अनेक मधुर आणि नवीन आवाजांची ओळख करून दिली आहे, जे आवाज आगामी पिढ्यांच्या काळात देखील दुमदुमत राहतील. या शोच्या आगामी सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर प्रथमच एकत्र येत आहेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल, बॉलीवूडचा मेलडी किंग कुमार सानू आणि लोकप्रिय संगीतकार आणि गायक विशाल दादलानी. हे परीक्षक स्पर्धकांना कशा प्रकारे मार्गदर्शन देऊन त्यांना तयार करतात, हे बघण्यासाठी परीक्षक उत्सुक आहेत. त्याचबरोबर, तब्बल 8 वर्षांनंतर यंदाच्या 14 व्या सत्रात होस्ट म्हणून हुसैन कुवाजेरवाला होस्ट म्हणून या शोची सूत्रे हाती घेणार आहे, त्याबद्दल देखील लोकांच्या मनात उत्सुकता आहे. ‘एक आवाज एक एहसास’ थीम असलेल्या या सत्रात अशा एका सुमधुर आवाजाचा शोध घेण्यात येईल जो आवाज श्रोत्याच्या मनात विविध भावना जागृत करणारा असेल. नवीन सीझन 7 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता सुरू होत आहे.
या लोकप्रिय शोमध्ये सूत्रसंचलनाची जबाबदारी घेण्यासाठी आतुर असलेला हुसैन म्हणतो, “हा सीझन म्हणजे खरोखर ‘म्युझिक का सबसे बडा त्योहार’ असणार आहे. इंडियन आयडॉलमध्ये परतताना मला खूप आनंद होत आहे, कारण या उद्योगातील माझ्या सुरुवातीच्या काळात या शोने मला मान्यता मिळवून द्यायला खूप मदत केली आहे. देशाच्या विविध प्रांतांमधून आलेले कोवळे आणि नवे आवाज ऐकताना खरोखर खूप मजा येते. अशा प्रतिभावंतांच्या प्रवासात सहभागी होणे ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे.”
सूत्रसंचालनाची कला कालानुरूप बदलत चालली आहे. त्याविषयी बोलताना हुसैन म्हणतो, “एक होस्ट म्हणून माझी सगळ्यात मोठी जबाबदारी स्पर्धकाच्या मनावरील दडपण कमी करून त्याला मोकळे होण्यास मदत करण्याची आहे. त्यांच्यासाठी सकारात्मक आणि हलकेफुलके वातावरण तयार केले की, ते परफॉर्म करताना बावचळून जात नाहीत आणि खुल्या आवाजात, आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी गाऊ शकतात. आताच्या सूत्रसंचालनात झालेला मोठा बदल म्हणजे, संचालन आता गंभीरपणे न करता संवादात्मक असते. एक होस्ट म्हणून परीक्षक, पाहुणे कलाकार आणि श्रोते यांच्याशी संवाद साधावा लागतो. या शोच्या प्रारंभिक टप्प्याचे शूटिंग आम्ही सुरू केले आहे. श्रेया, विशाल आणि कुमार दा यांच्यासोबत काम करताना मजा येत आहे.”
लिंक: https://www.instagram.com/reel/CxdQI07PCSb/
Comments
Post a Comment