दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३. 




भाद्रपद पौर्णिमा. वर्षा ऋतू, दक्षिणायन, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज उत्तम दिवस. *प्रोष्टपदी पौर्णिमा भागवत सप्ताह समाप्ती*

 चंद्रनक्षत्र - उत्तरा भद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सामान्य दिवस आहे. गृहसौख्यात काहीशी कमतरता जाणवेल. शेजाऱ्यांशी वाद टाळा. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. काही कामे मार्गी लागतील. महत्वचे करार आज नकोत.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरी/ व्यवसायात लाभ होतील. कामाला गती प्राप्त होईल. घशाची काळजी घ्या.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उच्च शिक्षणात यश लाभेल. कामाची गती वाढेल. प्रवासात काळजी घ्या.   

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) फारशी अनुकूलता नाही. काळजी पूर्वक निर्णय घ्या. खर्चात वाढ होईल. व्यसने टाळा. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरगुती कामात वेळ जाईल. पत्नीशी सहकार्य करा. व्यापारात लाभ.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभदायक दिवस आहे. मात्र रवी - चंद्र प्रतियुती आरोग्याचे प्रश्न निर्माण करेन.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विशेष विद्या प्राप्त होईल. ज्याची वाट बघत होतात ती घटना घडेल. धाडस दाखवाल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) विचारसरणी बाबत चर्चा होईल. आयुष्याला नवीन वळण लागेल. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभदायक कालावधी आहे. प्रगती होईल. मातेकडून लाभ होतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक गणिते कोलमडतील. व्यवस्थित नियोजन करा. प्रवासात काळजी घ्या. जेष्ठ व्यक्तीची चिंता वाटेल. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सप्तमात रवी आहे. विनाकारण वादविवाद टाळा. भागीदारीत सामोपचाराने वागा.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


 29 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात.


व्यवसाय:- भौतिक, रसायन, वैद्यकीय शास्त्र, गणित, पतपेढी व्यवस्थापक, पॅथॉलॉजी, जिथे तर्कनिष्ठता आणि बुद्धी लागते असे क्षेत्र तसेच वकिली.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.


शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.


शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments