दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३. 






भाद्रपद शुक्ल द्वादशी. वर्षा  ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज उत्तम दिवस" *भागवत एकादशी, वामन जयंती*


नक्षत्र - श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/कुंभ.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  योग्य कारणासाठी कारच होईल. नोकरीच्या ठिकाणी काही अप्रिय अनुभव येण्याची शक्यता आहे.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जेष्ठ व्यक्तच्या सहाय्याने वाटचाल सुखकर होईल. शत्रू पराभूत होतील. खर्चात वाढ संभवते.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिकूल दिवस आहे. मोठे करार नकोत. शक्यतो विश्रांती घ्यावी.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धनलाभाचा दिवस आहे. चांगले अनुभव येतील. मात्र पत्नीशी मतभेद होऊ शकतात. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पुढील काळासाठी आज खर्च होईल. दबदबा वाढेल. योग्य निर्णय घ्याल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  आज चांगला दिवस आहे.  शुक्राची साथ लाभेल. चैनीवर खर्च कराल. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कोणत्याही गैर व्यवसायात पैसे गुंतवू नका. प्रशासकीय नियम पाळा. गृहकलह टाळा.   

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल कालावधी आहे. मन आनंदी राहील. चांगले अनुभव येतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक दृष्टया चांगला दिवस आहे. आप्त भेटतील. मात्र नोकरीत काही तणावाचे प्रसंग येऊ शकतात.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अपेक्षा पूर्ण होतील. यशस्वी वाटचाल कराल. मात्र घरात कुरबुरी होऊ शकतात.  


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज फारशी अनुकूलता नाही. मागील प्रमाणे कामे चालू ठेवावीत. नवीन काही नको.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) महत्वाची कामे आज पूर्ण करवून घ्या. संधी चालून येतील. कमी बोलणे हिताचे आहे. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते.


व्यवसाय:-  वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.


शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.


शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.


शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, 5 तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments