प्रतिमा विद्या प्रतिष्ठान आयोजित पर्युषण महापर्व : विविध कार्यक्रमाचे आयोजन
षोडशकरण - दशलक्षण महापर्वात आर .के .नगर येथे भव्य साठ हजार फुट कलात्मक मंडपात मुनी गनाच्या प्रवचनाची पर्वणी : पश्चिम महाराष्ट्र सह बेळगांव मधील हजारोंचा सहभाग : प्रतिमा विद्या प्रतिष्ठान वतीने आरोग्य शिबीर - आचार्य भक्ती - अंहिसा रॅलीत सहभागाचे आहवान
कोल्हापूर 24 सिटी न्यूज नेटवर्क
- प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील भव्य मैदानात पाच एकर परिसरात उभारण्यात आलेल्या कलात्मक भव्य साठ हजार फूट कलामंडपामध्ये षोडशकरण आणि दशलक्षण महाप्रर्वास पश्चिम महाराष्ट - बेळगांव - कोकण मधील भाविक श्रावक - श्राविका हजारोच्या संकेत सहभागी होत आहेत . सकाळ च्या सत्रात प पू निर्यापक श्रमण मुनिश्री नियम सागर जी महाराज यांच्यासह पवित्र सागर जी महाराज , वृषभसागरजी महाराज , अभिनंदन सागरजी महाराज , सुपार्श्व सागरजी महाराज , प पू गणनी आर्यिका श्रुतमती माताजी , समतामती माताजी , शुल्लक संयमसागर जी च्या पवित्र वाणीच्या प्रवचनातून सर्वजण अंतर्मुख होत आहेत .
त्यानंतर सात्विक भोजनाने सकाळ च्या सत्राची सांगता होत आहे . सायंकाळ चा सत्रात ही यांच विषयावर प्रवचनात त्यांनी विवेचन केले . त्यानंतर आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत . यामध्ये षोडशकरण सह .क्षमा - मार्दव - आर्जव - शौच - सत्य - संयम - तप - त्याग - आकिंचन्य - ब्रम्हचार्य या दशलक्षणाच्या विविध पैलू नी त्यागी - व्यासंगी मुनीजन आपल्या अधिकार वाणी दारे विवेचन करीत आहेत . या भव्य कार्यक्रमासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेली तीन महिन्यांपासून अधिक काळ अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीय सचिन बहिर शेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले - ए के कामते - राजु शेठे , सचिन मिठारी, विशाल मिठारी, भूषण कावळे, वैभव कोगनुळे ,अमोल घोडके, अशोक बहिर शेठ, अवनीश जैन, सतीश पत्रावळे अनुपम भोजकर , अरुण तीर्थ, अमित बागे, सचिन पाटील, संजय टेंभुर्ले, यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्या समावेत कार्यरत आहेत .
आरोग्य शिबिर - आचार्य भक्ती - अहिंसा रॅलीचे आयोजन
या सोहळ्यामध्ये आगामी काळात सोमवार 25 सप्टेंबर रोजी दिवसभर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे .तर या सोहळ्याचा मुख्य आकर्षण असणारे 'आचार्य भक्ती ' मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे या सह रोज दैनंदिन प्रवचने आणि सायंकाळच्या वेळी अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल असणार आहे . या सोहळ्याची सांगता महात्मा गांधी जंयती दिनी दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी शहरातील दसरा चौक येथून प्रांरभ होवून प्रमुख मार्गावरून अहिंसा रॅली ने होणार आहे . तरी आगामी काळातील या सर्व मुख्य सोहळ्यात पंचक्रोशीतील सर्व भक्तगण श्रावण सविता यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिमा विद्या प्रतिष्ठान यांच्यावतीने जाहीर रित्या करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment